नवजीवन विद्यालय पाचोरा येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम संपन्न

नवजीवन विद्यालय पाचोरा येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम संपन्न

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिवस नवजीवन विद्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री एस बी पवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सुनील पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमात विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या हातून सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून वंदन करण्यात आले व कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला. विद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी भाषण करत सावित्रीबाई फुले यांच्या विषयी माहिती सांगितली. यासह विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक एस ए पाटील सर, आर वाय चौधरी सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्याविषयी सविस्तर माहिती दिली. यासोबतच ज्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात सहभाग घेत भाषण केले अशा विद्यार्थ्यांना श्री प्रमोद पाटील सर यांच्यातर्फे पुस्तक भेट देऊन त्यांचे अभिनंदन करत प्रोत्साहन देण्यात आले. कार्यक्रमास विद्यालयातील विद्यार्थ्यांसह विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधाकर पाटील सर व आभार प्रदर्शन जे व्ही पाटील सर यांनी केले.