सोयगावात मुसळधार पावसामुळे सोना नदीला महापूर; महिलांकडून नंदी मायची भक्तिभावाने पूजा
काही काळ सोयगाव व आमखेडा संपर्क तुटला होता.
दत्तात्रय काटोले
सोयगाव, दि. २७ (प्रतिनिधी) – गेल्या काही दिवसांपासून सोयगाव परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सोना नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला असून नदीच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर गावातील महिलांनी श्रद्धेने आणि भक्तिभावाने सोना नदीची ‘ओटी’ भरून सामूहिक पूजा केली.
गावातील महिलांनी पारंपरिक वेशभूषेत, हातात पूजा साहित्य घेऊन सोना नदीच्या तीरावर जाऊन “हे गं सोना नंदी माय, आता पुरे झाले, पाणी थांबव” अशा भक्तिपूर्ण भावनेने नदीची प्रार्थना केली. निसर्गशक्तीला नम्र विनंती करत सोना नंदी मातेची ओटी भरून पाणी वसरण्याची मागणी करण्यात आली.
या सामूहिक पूजेमध्ये शेकडो महिलांनी सहभाग सहभाग घेतला होता. पूजेनंतर महिलांनी नदीकिनाऱ्यावर नदीमायलला शांत हॊ अशी प्रार्थना केली. गावातील बुजुर्ग महिलांच्या मार्गदर्शनाखाली ही परंपरा जपली गेली.
गेल्या काही दिवसात प्रथमच एवढा पूर आल्यामुळे गावकऱ्यांमध्ये चिंता पसरली असताना, महिलांनी आपल्या श्रद्धेने वातावरणात एक प्रकारचा आध्यात्मिक सकारात्मकता निर्माण केली आहे. पूजनानंतर काही वेळात नदीच्या प्रवाहात सौम्य घट झाल्याचेही सांगण्यात येत आहे.