श्री.गो.से. हायस्कूल मध्ये शिवजयंती उत्साहात संपन्न

श्री.गो.से. हायस्कूल मध्ये शिवजयंती उत्साहात संपन्न

पा. ता सह शिक्षण संस्था संचलित श्री.गो. से. हायस्कुल पाचोरा येथे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.पी.एम वाघ मॅडम यांच्या हस्ते छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. यावेळी उपमुख्याध्यापक श्री. एन. आर. पाटील सर, पर्यवेक्षक श्री. आर. एल. पाटील सर, श्री. ए. बी. अहिरे सर, तांत्रिक विभाग प्रमुख श्री. एस. एन. पाटील सर, किमान कौशल्य प्रमुख श्री. एम. बी. बाविस्कर सर, सांस्कृतिक प्रमुख श्री. आर. बी. तडवी सर, उपप्रमुख श्री. आर. बी. बोरसे, शिक्षक व व शिक्षकेतर कर्मचारी वृंद तसेच विद्यार्थी उपस्थित होते.
प्रतिमा पूजननंतर छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक येथे आयोजित रॅलीत सर्व विद्यार्थी व शिक्षक यांनी सहभाग घेतला.
अनेक विद्यार्थ्यांनी मासाहेब जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज यांची वेशभूषा केली होती. याप्रसंगी संगीतशिक्षक श्री.सागर थोरात सर व श्री.रुपेश पाटील सर यांनी राज्य गीत व राष्ट्रगीत सादर केले.