सौ.सिंधुताई पंडितराव शिंदे, प्राथमिक शाळेत विज्ञान दिन मोठ्या उत्साहात

सौ.सिंधुताई पंडितराव शिंदे, प्राथमिक शाळेत विज्ञान दिन मोठ्या उत्साहात

पाचोरा – येथील गिरणाई शिक्षण संस्था संचलित सौ.सिंधुताई पंडितराव शिंदे प्राथमिक शाळेत दिनांक 28 फेब्रुवारी रोजी विज्ञान दिना निमित्त विज्ञान प्रदर्शन (Science exhibition) आयोजित करण्यात आले. इयत्ता 1vली ते 7 वी च्या वर्गातील 225 विद्यार्थ्यांनी 75 वैज्ञानिक प्रयोग , मॉडेल्स या विज्ञान प्रदर्शनात सादर केले.

उदघाटन प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष तात्यासाहेब पंडीतराव परशराम शिंदे हे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.पुजाताई अमोल शिंदे यांनी फीत कापून प्रदर्शनाचे उद्घाटन केले. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सहसचिव प्रा. शिवाजी शिंदे, सौ. सा. प. शिंदे शाळेचे मुख्याध्यापक सु. ना. पाटील व पर्यवेक्षक महेश देशमुख तसेच पालक बंधु भगिंनी उपस्थित होते. उपस्थित मान्यवर तसेच पालक यांनी सर्व विद्यार्थ्याचे कौतूक केले. या विज्ञान प्रदर्शनाची माहिती शाळेचे मुख्याध्यापक समाधान माधवराव महाजन यांनी दिली. तसेच गिरणाई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सन्मानीय तात्यासाहेब पंडितराव शिंदे यांनी विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक केले. या विज्ञान प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.