पाचोरा रोटरी च्या ‘तयारी अभ्यासाची’ व्याख्यानाला उदंड प्रतिसाद

पाचोरा रोटरी च्या ‘तयारी अभ्यासाची’ व्याख्यानाला उदंड प्रतिसाद

पाचोरा – येथील रोटरी क्लब ऑफ पाचोरा भडगाव तर्फे “तयारी अभ्यासाची” हा महासेमिनार घेण्यात आला. दिनांक 13 फेब्रुवारी रोजी दोन वेगवेगळ्या सत्रात आयोजित “तयारी अभ्यासाची” या व्याख्यानाला सुमारे 1700 विद्यार्थी , पालक व शिक्षकांनी उपस्थिती नोंदवली.

संपूर्ण भारताला अभ्यासाची गोडी लावणारा “तयारी अभ्यासाची” – हा महा सेमिनार स्वप्नशिल्प रेसिडेन्सी हॉटेलच्या वातानुकूलित हॉलमध्ये घेण्यात आला. रोटरीचे उपप्रांतपाल राजेश बाबूजी मोर, पाचोरा भडगाव रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. बाळकृष्ण पाटील, सचिव प्रा.डॉ पंकज शिंदे, पिटीसी शिक्षण संस्थेचे चेअरमन संजयनाना वाघ, गिरणाई शिक्षण संस्थेचे चेअरमन पंडितराव शिंदे, निर्मल फाउंडेशनच्या अध्यक्षा वैशालीताई सूर्यवंशी, मुख्य वक्ते डॉ. भगवान बि.जी. यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने सेमिनारला सुरुवात झाली. या प्रसंगी पाचोरा आदर्श माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ पूजाताई शिंदे, श्री गो से हायस्कूलचे मुख्याध्यापक सुधीर पाटील, शिंदे इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य डॉ. विजय पाटील, निर्मल इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य गणेश राजपूत, व उपप्राचार्य प्रदीप सोनवणे, प्रोजेक्ट डायरेक्टर उद्योजक प्रदीप पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या झालेल्या शैक्षणिक नुकसानीची भरपाई करण्याच्या उद्देशाने पाचोरा भडगाव रोटरी क्लब तर्फे या विशेष बुद्धीवर्धक व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. तारीख 13 रोजी दुपार सत्रात अडीच तास व सायंकाळच्या सत्रात अडीच तास अशा दोन स्वतंत्र सत्रांमध्ये शेकडो विद्यार्थी पालक व शिक्षकांनी तयारी अभ्यासाची यामहा सेमिनारला उपस्थिती नोंदवली. सायंकाळच्या सत्रात पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोरआप्पा पाटील यांनी उपस्थिती नोंदवली व रोटरीच्या उपक्रमाचे मुक्तकंठाने कौतुक केले. अभ्यासाचे तंत्र, मेमरी टेक्निक, स्मरणशक्तीला चालना देणारे उपक्रम, अभ्यासाच्या विविध क्लुप्त्या व पद्धती यावर अत्यंत साध्या शब्दात व मनोरंजक पद्धतीने डॉक्टर भगवान बी.जी. यांनी सखोल मार्गदर्शन केले.

सेमिनारच्या यशस्वीतेसाठी रो.निलेश कोटेचा, रो. रुपेश शिंदे, रो. शिवाजी शिंदे, रो. डॉ गोरख महाजन, रो.डॉ.अमोल जाधव, रो.डॉ.प्रशांत पाटील, रो.डॉ.पवन पाटील, रो.डॉ. वैभव सूर्यवंशी,रो.चंद्रकांत लोढाया आदींनी यशस्वी परिश्रम घेतले. शिवाजी शिंदे यांनी सूत्रसंचालन केले, सेक्रेटरी रो.डॉ.पंकज शिंदे यांनी आभार मानले.