निंभोरा विकासोच्या चेअरमन पदि आशाबाई पाटील तर व्हाईस चेअरमन पदि विजय पाटील यांची बिनविरोध निवड
भडगाव वार्ताहर — तालुक्यातील निंभोरा येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाची निवडणुक नुकतीच पार पडली.
संस्थेच्या नवनिर्वाचीत चेअरमन पदी आशाबाई शिवाजी पाटील यांची तर व्हाईस चेअरमन पदी विजय बाबुलाल पाटील यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. ही निवडणुक महेश कासार सहाय्यक निबंधक भडगाव तथा निवडणुक निर्णय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यांना संस्थेचे सचिव दत्ता त्रंबक पाटील व सेवक विलास सुदाम पाटील यांनी सहकार्य केले. चेअरमन महादु कौतिक पाटील व व्हाईस चेअरमन धुडकु मोरे यांनी ठरलेल्या कार्यकाळानुसार पदाचा राजीनामा दिल्याने या दोघ रिक्त जागेसाठी हा निवडीचा कार्यक्रम घेण्यात आला. नवनिर्वाचीत चेअरमन आशाबाई पाटील, व्हाईस चेअरमन विजय पाटील यांचा सत्कार संचालक मंडळ व ग्रामस्थांमार्फत करण्यात आला व पुढील पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी संचालक महादु कौतीक पाटील, दिलीप मन्साराम पाटील, निंबा शिवराम पाटील, भगवान अर्जुन पाटील, बालू शंकर पाटील, भगवान पाटील, साहेबराव पाटील, भारत पाटील, प्रमिलाबाई पाटील, भिकचंद सोनी, धुडकु मोरे, यासह पोलीस पाटील शरद पाटील, वाल्मीक नारायण पाटील, बळवंत पाटील, सुधाकर पाटील, विकास पाटील, रवींद्र पाटील, डॉ संभाजी पाटील, गोरखनाथ पाटील ,गुलाब पाटील आदि ग्रामस्थ उपस्थित होते.

























