श्री. गो. से. हायस्कूल पाचोरा येथे शासकीय बाल चित्रकला स्पर्धा संपन्न

श्री. गो. से. हायस्कूल पाचोरा येथे शासकीय बाल चित्रकला स्पर्धा संपन्न

पाचोरा ( प्रतिनिधी)
पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री. गो.से .हायस्कूल पाचोरा. येथे महाराष्ट्र राज्य बाल चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. ई. पाचवी ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. गट तिसरा व गट चौथा या वयोमानानुसार विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर चित्र काढली. पाचोरा गटशिक्षणाधि यांच्या परिपत्रकानुसार आज दिनांक 11 ऑगस्ट रोजी सकाळी स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेसाठी शाळेतील मुख्याध्यापिका सौ प्रमिला वाघ, उपमुख्याध्यापक एन. आर. पाटील. रवींद्र बोरसे. यांनी स्पर्धेतील विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन विद्यार्थ्यांच्या विविध कलाकृतीचे कौतुक केले.यावेळी कलाशिक्षक सुनील भिवसणे, सुबोध कांतायण, प्रमोद पाटील, सौ ज्योती पाटील यांनी प्रमुख मार्गदर्शन केले.