गावांनी एकत्र येऊन देणगी देऊन मंदिर उभारणे हीच खरी हिंदू संस्कृती : सौ.धनश्रीताई विखे

  1. गावांनी एकत्र येऊन देणगी देऊन मंदिर उभारणे हीच खरी हिंदू संस्कृती : सौ.धनश्रीताई विखे

(सुनिल नजन अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी) सर्व गावांनी एकत्र येऊन देणगी देऊन मंदिर उभारणे हीच खरी हिंदू संस्कृती असल्याचे प्रतिपादन अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्या सुविद्य पत्नी सौ.धनश्रीताई विखेपाटील यांनी केले.त्या अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा येथील गणपती,शनी, हनुमान मंदिरातील मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळ्या प्रसंगी बोलत होत्या.माजी सरपंच कल्याणीताई वाघ यांच्या हस्ते सौ.धनश्रीताई विखे यांचा सन्मान करण्यात आला.”काशि” या तीर्थक्षेत्राहुन शंभरहून अधिक भाविकांनी पाणी आणून या सोहळ्याची वेदशास्त्रसंपन्न ब्राह्मणांच्या मंत्रोच्चारात सुरुवात केली.या सोहळ्यासाठी होम,हवन,शांतीपाठ, यज्ञ,भजन, हरिपाठ ,किर्तन,अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.सर्व ह.भ.प.भगवान महाराज मचे, सुरेशानंद कोळेकर, सुधाकर वाघ, आदिनाथ दाणवे, बबन बहिरवाल, महंत आदिनाथ शास्त्री, ज्ञानेश्वर माउली कराळे, रामगिरी येळीकर या नामांकित महाराजांची किर्तने झाली.व्रुद्धेश्वर वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब मतकर यांच्या विद्यार्थ्यांच्या वतीने गावातुन ग्रंथ दिंडी प्रदक्षिणा मिरवणूक काढण्यात आली होती.मंगळवार दि.१३फेब्रुवारी रोजी ह.भ.प.राम महाराज झिंजुर्के यांच्या काल्याच्या किर्तनाने महाप्रसादानंतर या सोहळ्याची सांगता झाली.सौ.धनश्रीताई विखे यांच्या कडे झिंजुर्के महाराज यांनी भाविकांना अयोध्येला जाण्यासाठी जिल्ह्यातून स्पेशल रेल्वे मिळण्यासाठी खासदार सुजय विखे पाटील यांनी प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले तर अॅडहोकेट वैभवराव आंधळे यांनी ग्रामस्थांच्या वतीने या मंदिरासमोर, खासदार निधीतून मोठा सभामंडप मिळावा म्हणून मागणी केली.गावचे नवनिर्वाचीत लोक नियुक्त सरपंच चारुदत्त उद्धवराव वाघ यांच्या महाप्रसादाच्या पंगती नंतर या सोहळ्याची सांगता झाली.या मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज कराळे माउली, रमेश अप्पा महाराज, तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री , यांच्या हस्ते कलशारोहण आणि मुर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.या सोहळ्यासाठी गावातील जेष्ठ नेते उद्धवराव वाघ यांच्या हस्ते मंदिर उभारण्यासाठी ज्यांनी विषेश सहकार्य व आर्थिक देणगी दिली त्यांचा सन्मान केला. यावेळी अॅडहोकेट प्रतापराव ढाकणे,जेष्ठ नेते पोपटराव आंधळे, विद्यमान सरपंच चारुदत्त वाघ, बाबासाहेब सरगड, अण्णा तळेकर, माजी सरपंच शिवाजीराव मतकर, आबाजी महाराज आंधळे, धर्माजी भोसले, प्रल्हाद महाराज आंधळे, युवा नेते अमोल वाघ, नामदेव सरगड, सोसायटीचे सेक्रेटरी भाऊराव कासार पाटील, दत्तात्रय भोसले, जवखेडे दुमाला सोसायटीचे चेरमन कचरू पाटील नेहुल, संचालक वसंतराव नेहुल, हरीभाऊ जाधव, राजेंद्र मतकर सर, विठ्ठल मतकर, विष्णू घाटूळ, विठ्ठल लांघे,पोपट वाघ, अशोक वाघ, संभाजी आंधळे, हनुमान चितळे, भाऊसाहेब वाघ, उत्तमराव आंधळे, भैय्या दुकानदार, उद्धव दुसंग यांच्या सह पंचक्रोशीतील हजारो भाविक भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.महिलांची उपस्थीती लक्षणिय होती.