वडूले खुर्द येथे विश्वकर्मा जयंती निमित्त सुरू असलेल्या सप्ताहाची रवीदासजी महाराज शास्त्री यांच्या काल्याच्या किर्तनाने सांगता

(सुनिल नजन चिफब्युरो स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा)
वडुले खुर्द तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर येथील भगवान विश्वकर्मा जयंती निमित्त सुरू असलेल्या सप्ताहाची सांगता रवीदास महाराज शास्त्री (आळंदी देवाची)यांच्या काल्याच्या किर्तनाने झाली. देवाची,गुरुची, सज्जनाची संगती धरा,संत तुकाराम महाराज यांच्या जीवनात परमात्मा चिंतना शिवाय काहीच उरत नव्हते त्यांना परमात्म्याचा साक्षात्कार भामरा डोंगरावर झाला होता.तुकाराम महाराज देवाला म्हणतात तुमच्या संगती मध्ये आल्या नंतर आमचे जिवन निश्चिंतीला प्राप्त झाले आहे.असे प्रतिपादन शेवगाव तालुक्यातील वडुले खुर्द येथील भगवान विश्वकर्मा जयंतीच्या निमित्ताने सुरू असलेल्या काल्याच्या किर्तना प्रसंगी रवीदास महाराज शास्त्री (आळंदी देवाची)यांनी केले.या प्रसंगी त्यांनी “तुझीये संगती झाले अमुचे निश्चिंती, नाही देखीले ते मिळे,भोग सुखाचे सोहळे”हा संत तुकाराम महाराज यांचा परमात्म्याच्या संगतीत गेल्या नंतर आपल्या जिवनाचे परीवर्तन करणारा अभंग सेवेसाठी निवडला होता.शास्त्री महाराज पुढे सांगतात जिवनात संगती महत्वाची आहे.आपल्या जिवनाचे मुल्य वाढवायचे आहे की घटवायचे आहे हे आपल्या संगतीवर अवलंबून आहे.चुकीच्या माणसाची संगती शरीराने,वाचेने, मनाने करु नये.ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात परमार्थ न करणाऱ्या माणसाशी आपण बोलू नये.संगती साधुसंतांची करावी असा आग्रह आमच्या साधु संतांनी धरलेला आहे.परीसाच्या संगतीमुळे लोखंडाचे सोने झाले.परमात्मा सुद्धा संतांच्या संगतीत आकळला जाऊ शकतो असा मोठा लाभ संतांच्या संगतीत आहे.परमार्थीक जिवन हे खऱ्या अर्थाने निश्चिंतीचे जीवन आहे.जेथे देव आहे तेथे चिंताच रहात नाही.भगवंताच्या संगतीत गेल्यावर जे आम्ही आतापर्यंत पाहीले नव्हते त्याचा लाभ आम्हाला झाला.ते आम्हाला आता प्रत्यक्षात प्राप्त झाले.भगवंताच्या संगती मध्ये इच्छीत गोष्टी प्राप्त होतात हे फार मोठे लौकीक आहे.पुर्वी आमच्या घरी ताकाचे सरोवर होते.भगवंताच्या संगती मध्ये राहणे हे जीवनाचे सार आहे.तुकाराम महाराज सांगतात की देवा आम्ही तुमच्या संगतीत आलो आहोत.तुम्ही आम्हाला हाकलून दिले तरी आम्ही आता तुमच्या संगतीतून जाणार नाहीत.तुकाराम महाराजांनी निर्धार सांगितला होता की हे देवा आम्ही आमचे जिवन तुम्हाला समर्पित केले आहे.देवा तुझ्या संगती मध्ये आता आमची निश्चिंती झाली आहे.रासक्रिडा करावयास आलेल्या गोपिकांना सुद्धा देवाच्या संगतीचा लाभ झाला. गोकुळातील गौळणी असामान्य होत्या त्या श्रुती झाल्या.परमार्था मध्ये भेद जाणू नये.भगवंतांनी सर्व गोपाळांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या.हाच खरा काला आहे.ही समानता त्या काळी भगवंतांनी वृंदावनात सुरू केली होती.याप्रसंगी शिवनाथ महाराज रणमले,गणेश महाराज रणमले, श्रीहरी महाराज राउत,अशोक महाराज गीर्हे, योगेश महाराज आव्हाड,कुंडलीक महाराज गोरे, महादेव महाराज आव्हाड,नवनाथ महाराज आव्हाड, राजेंद्र महाराज आव्हाड, बाबासाहेब महाराज आव्हाड, शिवाजी महाराज आव्हाड,जगन्नाथ महाराज खेडकर, विणेकरी आनंदा मिसाळ,तसेच वडुले खुर्द पंचक्रोशीतील अनेक भाविक भक्त, माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.पांडूरंग विश्वनाथ राउत,घेवरी चांदगाव,तालुका शेवगाव यांच्या काल्याच्या महाप्रसादाच्या पंगतीने या सोहळ्याची सांगता झाली.वडुले ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती.






















