जि.प.प्रशाला सोयगाव येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप व शालेय स्पर्धा बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न

जि.प.प्रशाला सोयगाव येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप व शालेय स्पर्धा बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न

 

 

सोयगाव प्रतिनिधी,दत्तात्रय काटोले

आज दिनांक 4 फेब्रुवारी 2026 रोजी जिल्हा परिषद प्रशाला सोयगाव येथे एस. एस.सी.बॅच 2025_26 या विद्यार्थ्यांना विद्यालयातर्फे शिक्षक व विद्यार्थी यांचे तर्फे निरोप समारंभ आयोजित करून सस्नेह निरोप देऊन भावी शैक्षणिक वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या तसेच शाळेतील विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण कार्यक्रम यावेळी संपन्न झाला.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशालेचे मुख्याध्यापक श्री दादाराव राठोड सर होते.

यावेळी मयुरी महाले, वृषाली गारखेडे या विद्यार्थिनी सह इयत्ता दहावीच्या विद्यार्थी यांनी शाळेतील त्यांच्या शालेय जीवनातील आठवणीवर आधारित भावूक होत मनोगत व्यक्त केले शाळा व शिक्षक यांच्या बद्दल कृतज्ञ भाव व्यक्त करून आपल्या भावी जीवनात यशस्वी होण्यासाठी शाळेतील शिक्षणाचे महत्त्व सांगितले.इयत्ता 10 वी बॅच तर्फे विद्यालयास फ्रेम भेट देण्यात आली. याप्रसंगी प्रास्ताविकात श्री दौलतसिंग परदेशी यांनी विद्यार्थ्यांना भावी आयुष्य शुभेच्छा देऊन त्यांचे भावी आयुष्य घडवण्यासाठी सकारात्मक ऊर्जा निर्माण करून आपण आपल्या जीवनातील आव्हानांना सामोरे जावे असे सांगितले, श्री अरुण सोहनी यांनी विद्यार्थ्यांना व्यक्तीच्या जीवनातील शालेय जीवनाचे महत्त्व व जिल्हा परिषद शाळा गुणवत्ता पूर्ण कशा होतील यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले. यानंतर प्रशालेची पदवीधर शिक्षक श्री भास्कर चौधरी यांनी विद्यार्थ्यांना पुढील करिअर निवड साठी बहुमोल मार्गदर्शन केले साईवंशा कॉम्प्युटर चे संचालक श्री बिरारजी गायकवाड व श्री राजेंद्र जावरे यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या व त्यांच्यातर्फे सर्व एस एस सी विद्यार्थ्यांना डिजिटल शालेय ओळखपत्र व परीक्षेसाठी उपयोगी साहित्य वाटप केले. यानंतर सहेली ब्युटी स्टुडिओच्या संचालिका श्रीमती शितलताई चौधरी यांनी विद्यार्थ्यांना विविध स्पर्धेतील यशाबद्दल प्रोत्साहन पर सुंदर अशा ट्रॉफी बक्षीस म्हणून मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आल्या. सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना भावी आयुष्य शुभेच्छा देऊन त्यांच्या एसएससी परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या

यावेळी वरील मान्यवरांसह प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्ते संजय शहापूरकर,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य शांताराम ढगे,शिक्षक पंकज रगडे पालक सुरेश घन,अंबादास जाधव,सिकंदर तडवी, लोककलावंत विष्णू मापारी,आरोग्य दूत दिगंबर वाघ ,समाधान चौधरी, माजी विद्यार्थी सचिन चौधरी यांचेसह प्रतिष्टीत नागरिक पालक, विद्यार्थी यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्र संचलन दुर्गा वारंगणे हिने केले तर आभार पूनम गायकवाड इयत्ता 9 वी यांनी मानले

कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक श्री सुकदेव पाटील,दौलतसिंग परदेशी,भास्कर चौधरी,राजेंद्र उंबरकर,विद्याधर बागुल,संगीता सोनवणे, जया वाघ,वैजनाथ सावळे,शिवाजी नवले,निदेशक शिवराम आगे,सचिन ढगे,सीमा राऊत यांनी परिश्रम घेतले.