श्री गो.से. हायस्कूलला मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा जिल्हास्तरीय समितीची भेट

श्री गो.से. हायस्कूलला मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा जिल्हास्तरीय समितीची भेट

 

पाचोरा-येथील पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेच्या श्री गो.से.हायस्कूलला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा दोन अंतर्गत जिल्हास्तरीय शाळा मूल्यांकन समितीने भेट देत शाळेच्या विविध विभागांची पाहणी करून समाधान व्यक्त केले.

या समितीच्या प्रमुख श्रीमती प्रतिभा भावसार, श्रीमती सुषमा इंगळे,श्रीमती सरोज गायकवाड , श्रीमती सीमा पाटील यांनी शाळेला भेट देऊन विद्यार्थी सुरक्षा समिती,सखी सावित्री समिती, विद्यार्थी तक्रारपेटी व विद्यार्थ्यांच्या तक्रारीचे निराकरण उपाय योजना त्याचप्रमाणे विद्यालयातील स्वच्छता परसबाग, क्रीडांगणावर कबड्डी,खो-खो ,बास्केटबॉलचे मैदान, गोळा फेक, थाळीफेक, भालाफेक ,लांब उडी ,उंच उडी चे मैदाने ,व्यायाम शाळा व क्रीडा साहित्य विभाग, दिव्यांगासाठी स्वच्छतागृह, रंगमंच, विज्ञान /गणित प्रयोगशाळा तसेच ग्रंथालय, ई लर्निंग रूम, संगणक कक्ष, चित्रकला गृह, संगीत विभाग,मुख्याध्यापक कक्ष तसेच उपमुख्याध्यापक व पर्यवेक्षक दालन, कार्यालय विभाग ,तांत्रिक विभाग किमान कौशल्य विभाग,शिक्षक बंधू-भगिनी यांचे दालन, हॅन्ड वॉश, सुरक्षा ऑडिट, सूचना/तक्रार व प्रथमोपचार पेटी, ऑटोमॅटिक सॅनिटरी नॅपकिन वेडिंग मशीन, पावसाच्या पाणी व्यवस्थापन,

घनकचरा व्यवस्थापन त्याचप्रमाणे सरल प्रणाली व यु-डायस प्रणाली,आधार कार्ड अपडेट,हजर विद्यार्थी संख्येचे प्रमाण,संच मान्यता, शिक्षक बंधू भगिनी यांची सेवा पुस्तिका,आणि विद्यांजली पोर्टलची माहिती, महावाचन अंतर्गत विद्यार्थ्यांचे अभिप्राय अपलोड करणे, सोलर सिस्टिम, ऑनलाईन माहिती पॅट अंतर्गत सर्व माहिती तसेच विद्यार्थ्यांच्या संचयिका, समग्र प्रगती पुस्तक,आणि शिष्यवृत्ती बाबतची सर्व शालेय अभिलेखे तपासून समाधान व्यक्त केले.सदर तपासणी होत असताना शाळेचे मुख्याध्यापक श्री.एन. आर.पाटील , उपमुख्याध्यापक श्री. आर एल पाटील , पर्यवेक्षक श्री ए बी अहिरे सर, व सौ. ए .आर.गोहिल मॅडम, कार्यालयीन प्रमुख श्री अजय सिनकर, तांत्रिक विभाग प्रमुख श्री.एस. एन.पाटील, किमान कौशल्य विभाग प्रमुख श्री एम.बी.बाविस्कर, सांस्कृतिक विभाग प्रमुख महेश कौंडीण्य , उपप्रमुख श्री.आर.बी.

बोरसे, क्रीडाप्रमुख श्री एस.पी.करंदे ,श्री.डी.आर. टोणपे , श्री.पी.एम. पाटील,श्री. अरुण कुमावत, श्री सुबोध कांतायन, श्री आर बी तडवी, श्री रुपेश पाटील, स्काऊट गाईड प्रमुख श्री आर.बी.कोळी तसेच सर्व शिक्षक बंधू-भगिनी कर्मचारी वर्ग यांचे सहकार्य लाभले.