शिवसेना-उबाठाची मशाल भ्रष्टाचारांना भस्मसात करणार : वैशालीताई सुर्यवंशी

शिवसेना-उबाठाची मशाल भ्रष्टाचारांना भस्मसात करणार : वैशालीताई सुर्यवंशी

दिपावली फराळ कार्यक्रमात पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी हितगुज

 

पाचोरा, दिनांक ३ (प्रतिनिधी ) : सध्या सुरू असलेल्या प्रचारात जनतेचा मिळणारा प्रतिसाद पाहता शिवसेना-उबाठाची मशाल ही भ्रष्टाचाऱ्यांना भस्मसात करणार ! असा आशावाद व्यक्त करत सर्वांनी या लढ्यात उतरण्याचे आवाहन वैशालीताई सुर्यवंशी यांनी केले. त्या दिपावली फराळ कार्यक्रमात बोलत होत्या.

 

पाचोरा-भडगाव मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी दिवाळीनिमित्त आपल्या सहकाऱ्यांसोबत निवासस्थानी फराळ कार्यक्रमात हितगुज केले. याप्रसंगी ताईंनी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देत संवाद साधला. यात प्रामुख्याने प्रचार फेरीत मिळणाऱ्या प्रतिसादामुळे आपण या परिवर्तनाच्या लढाईत यशस्वी होणार असल्याचा आशावाद त्यांनी व्यक्त केला. विरोधक आता धास्तावले असून ते रडीचा डाव खेळत आहेत. याचाच अर्थ आपल्याला जनतेचा कौल मिळणार आहे. मात्र आता गाफील राहून चालणार नसून सर्वांनी सतर्क राहण्याचे आवाहन वैशालीताई सुर्यवंशी यांनी याप्रसंगी केले.

 

या दिपावली फराळ कार्यक्रमाला शिवसेना-उबाठा पक्ष, युवासेना, युवती सेना, महिला आघाडी तसेच अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.