पालकमंत्री ना.राधाक्रुष्ण विखे पाटील यांच्या कडून नेवाशाचा पाणी प्रश्न सोडविण्याचे प्रशासनाला तातडीचे आदेश : मा.आ.मुरकुटे

पालकमंत्री ना.राधाक्रुष्ण विखे पाटील यांच्या कडून नेवाशाचा पाणी प्रश्न सोडविण्याचे प्रशासनाला तातडीचे आदेश : मा.आ.मुरकुटे

(सुनिल नजन अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी) पाणी टंचाई बाबद अहमदनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांच्या अध्यक्षतेखाली टंचाई बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी पाणी टंचाई जाणवत असलेल्या अनेक तालुक्यातील कार्यकर्त्यांकडून निवेदने स्वीकारली.नेवाशाचे भाजपाचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी नेवासा शहरातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न जिल्हाधिकारी व पालक मंत्र्यांसमोर उपस्थित केला होता. मुरकुटे यांनी सांगितले की नेवासा शहराला पाणीपुरवठा करणारी पाईप लाईन तिन-चार वर्षांपासून सातत्याने फुटत आहे.त्यामुळे नेवासा शहराला होणारा पाणीपुरवठा वारंवार खंडित होत आहे.कडक उन्हाळा सुरू होण्यासाठी अजून यथा अवकाश असतानाच ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर ही पाईप लाईन प्रवरासंगम येथे म्रुतावस्थेत शेवटच्या घटका मोजत आहे.त्यामुळे नेवासा शहराला गेल्या वीस दिवसांपासून पिण्याच्या पाण्याचा एक थेंबही मिळालेला नाही.त्यामुळे नेवासा शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. उन्हाळा सुरू होण्याआधीच नेवाशात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे.सर्व सामान्य जनतेला पिण्याच्या पाण्याची पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे नेवासा शहरातील जनतेचे आणि उद्योजकांचे पाण्याविना फार हाल होत आहेत.शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने प्रवरासंगम येथील पाईप लाईन बदलण्याची गरज आहे.पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांनी त्वरित लक्ष घालून होणारा खर्चही ताबडतोब उपलब्ध करून द्यावा आणि आठ दिवसांच्या आत पाईप लाईन बदलून नेवासा शहराला पाणीटंचाई पासून मुक्त करावे असा प्रस्ताव माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी या बैठकीत मांडला होता.या विषयावर अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तातडीने निर्णय घेऊन अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांना आठ दिवसांत नेवासा शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठीचे आदेश दिले आहेत. जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले त्यावेळी कर्जत -जामखेड तालुक्यातील भाजपाचे विधानपरिषदेचे आमदार राम शिंदे,नेवासा शहरातील नगरसेवक सुनिल वाघ, नेवासा विधानसभा संयोजक विवेक नन्नवरे,भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस प्रतिक शेजुळ,शहर सरचिटणीस श्रीकांत बर्वे, संतोष पंढुरी, हे आवर्जून उपस्थित होते.माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी सत्तेवर नसतानाही योग्य वेळी लक्ष घालून पाणी पुरवठा योजना सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केल्यामुळे जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी आता मुरकुटे शिवाय पर्याय नसल्याचे लोक खाजगीत बोलताना सांगतात.