लोकसभा निवडणुकीचा नगारा वाजला, महाराष्ट्रात १९,२६ एप्रिल,७,१३,२० मे या पाच तारखांना होणार निवडणूकीची रणधुमाळी !

लोकसभा निवडणुकीचा नगारा वाजला, महाराष्ट्रात १९,२६ एप्रिल,७,१३,२० मे या पाच तारखांना होणार निवडणूकीची रणधुमाळी !

‌ (सुनिल नजन “चिफ ब्युरो” अहमदनगर जिल्हा) ‌‌ देशातील संपूर्ण राजकीय पक्षांचे लक्ष लागलेल्या लोकसभा निवडणुकीचा नगारा अखेर आता वाजला आहे.नवीदिल्ली येथिल विज्ञान भवनात निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन लोकसभा निवडणुकीची घोषणा केली.संपुर्ण देशभर १९एप्रिल पासून सात टप्प्यात निवडणूका होणार आहे.परंतु महाराष्ट्रात मात्र पाच टप्प्यात मतदान होणार आहे. महाराष्ट्रातील पहिला टप्पा हा १९ एप्रिल रोजी होणार आहे.या दिवशी नागपूर, रामटेक, भंडारा -गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली -चिमूर या पाच मतदारसंघात निवडणूक होणार आहे.दुसरा टप्पा २६ एप्रिल रोजी होणार आहे.या दिवशी अकोला अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी या नउ मतदारसंघात निवडणूक होणार आहे.तिसरा टप्पा ७ मे रोजी होणार आहे.या दिवशी बारामती, रत्नागिरी -सिंधुदुर्ग,रायगड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, हातकणंगले या दहा मतदारसंघात निवडणूक होणार आहे.चौथा टप्पा १३ मे रोजी होणार आहे.या दिवशी अहमदनगर, शिर्डी,बीड, संभाजीनगर, जालना, जळगाव, रावेर, नंदुरबार, पुणे, शिरुर,मावळ या आकरा मतदारसंघात निवडणूक होणार आहे.पाचवा टप्पा २० मे २०२४रोजी होणार आहे.या दिवशी नाशिक, दिंडोरी, धुळे, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, आणि मुंबईतील सहा जागा अशा एकूण तेरा मतदारसंघात निवडणूक होणार आहे.महाराष्ट्रात एकूण ४८ लोकसभा मतदारसंघात ही निवडणूक होणार आहे.देशातील ईतर भागात २५मे आणि १जून रोजी निवडणूक होणार आहे.निवडनुकीची मतमोजणी ४जून २०२४ रोजी संपुर्ण देशभर होउन त्याच दिवशी निकाल जाहीर करण्यात येणार आहे. या पत्रकार परिषदेस मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार,ज्ञानेश कुमार,सुखवींदर सिंग संधू हे आवर्जून उपस्थित होते.भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही निवडणूक भाजप मोठ्या मताधिक्याने जिंकणार असुन पुन्हा मोदी हेच प्रधानमंत्री होतील अशा विश्वास व्यक्त केला.जागा वाटपाचा तिढा दोन तीन दिवसांत सुटणार आहे. जागा वाटपात महायुतीत काहीच गडबड गोंधळ नसल्याचे त्यांनी सांगितले .