लिंगपिसाट शिक्षकाने शालेय विद्यार्थीनींवर केलेला अत्याचार दडपण्यासाठी नराधम शिक्षकाला मदत करणारे गावातील चार गावपुढारी अटकेत
(सुनिल नजन “चिफब्युरो”स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) पुर्वीच्या काळी शिक्षकांना अतिशय वंदनीय गुरुजी म्हणून संबोधले जात होते.परंतू हल्लीच्या काळात शिक्षकी पेशाला काळिमा फासणाऱ्या अनेक घटना समाजात घडत आहेत.अनेक शिक्षक हे बीअरबार मध्ये झिंगलेल्या अवस्थेत आढळून येत आहेत. अशीच एक शिक्षकी पेशाला बदनाम करणारी आणि काळिमा फासणारी निंदनीय घटना आजच्या काळातील वंदनीय शिक्षक महोदयाकडून घडली आहे.ही शिक्षकी पेशाला कलंकित करणारी आणि अतिशय निंदनीय घटना अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील एका शाळेत घडली आहे.या बाबतची माहिती अशी की दिनांक १ऑगष्ट २०२५ रोजी आणि त्या पुर्वीही अनेक वेळा एक महिन्यापासून पाथर्डी तालुक्यातील एका गावातील शाळेत इयत्ता तिसरीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या ७वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीस दुपारच्या सुट्टीत शाळेतील सर्व मुले बाहेर गेल्यावर त्या शाळेतील नराधम शिक्षक संजय उत्तम फुंदे,राहणार,पाथर्डी शहरातील आनंद नगर, यांनी तीला एकटीला शाळेत थांबवून तीस जवळ घेऊन त्याच्या मांडीवर बसवून तीच्याशी लगट करत त्या शालेय विद्यार्थ्यीनीं वर वेळोवेळी अत्याचार केला.जर तीने काही आरडाओरडा केला तर तीला मारहाण करून गप्प बसविले जात होते.ही घडलेली सदरची घटना पिडीत मुलीच्या आईने गावातील स्वतःला युवा नेते,सामाजिक कार्यकर्ते,गावपुढारी म्हणून घेणाऱ्या गावातील १)आदिनाथ रामनाथ दराडे,२)राजेंद्र सुर्यभान दराडे,३)मुनवरखान सर्वरखान पठाण,४)उमर नियाज पठाण सर्व राहणार पागोरी पिंपळगाव, तालुका पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर यांना सांगितली असता त्यांनी तुम्ही परप्रांतीय आहात घडलेल्या घटनेची कुठेही वाच्यता करू नका नाहीतर आम्ही तुम्हाला या गावातच राहु देणार नाही असे म्हणून पिडीत मुलीच्या आई वडीलांना धमकावले होते.आणि सदरच्या घटनेची तक्रार पाथर्डी पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यास विरोध केला होता.म्हणून पाथर्डी पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेल्या शालेय विद्यार्थ्यांनीच्या अत्याचाराच्या पोस्को कलमा अंतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यात स्वतःला गावपुढारी म्हणून घेणाऱ्या १) आदिनाथ रामनाथ दराडे,२) राजेंद्र सुर्यभान दराडे, ३) मुनवरखान सर्वरखान पठाण,४)उमर नियाज पठाण सर्व राहणार पागोरी पिंपळगाव, तालुका पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर यांना पाथर्डी पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक विलास पुजारी साहेब आणि त्यांच्या पथकाने अटक केली आहे.अत्याचार करणाऱ्या पेक्षा अत्याचार सहन करणारा विश्वास घातकी समाजही त्यापेक्षा जास्त दोषी असतो हे या घडलेल्या घटनेवरून दिसून येते. सदर घटनेतील नराधम शिक्षकास फरार होण्यात वरील अटक करण्यात आलेल्या चार गाव पुढाऱ्यांनी मदत केली होती असा संशय आहे.त्यामुळे सदर शिक्षक फरार होण्यात यशस्वी झाला आहे.परंतू जगाच्या पाठीवर कुठेही पळून गेला तरी आम्ही त्याच्या मुसक्या आवळून त्याला जेरबंद केल्याशिवाय राहणार नाहीत असे पाथर्डी पोलिसांचे म्हणणे आहे.सदरची ही कारवाई अहिल्यानगर जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे साहेब,अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे साहेब आणि शेवगाव विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी या पदाचा नुकताच तात्पुरता अधिभार देण्यात आलेले श्रीरामपूर विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी शिवपुजे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पाथर्डी पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक विलास पुजारी साहेब यांच्या पथकातील पोलिस सब इन्स्पेक्टर विलास जाधव,पोलिस कॉन्स्टेबल संदिप ढाकणे,नितीन दराडे, बाबासाहेब बडे,ईजाज सय्यद,अक्षय वडते, विलास जवरे यांच्या पथकाने केली आहे.या घटनेमुळे शालेय विद्यार्थ्यांच्या पालक वर्गात अतिशय संतापाची लाट उसळली आहे.आपल्या मुलींना शाळेत पाठवावे की नाही हा मोठा यक्षप्रश्न शालेय विद्यार्थ्यीनींच्या पालकापढे निर्माण झाला आहे.