संत ज्ञानेश्वर महाविद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा

संत ज्ञानेश्वर महाविद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा

 

 

 

दत्तात्रय काटोले

सोयगाव : अजिंठा शिक्षण संस्थेच्या संत ज्ञानेश्वर महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग व राज्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिरीष पवार यांनी भूषविले. तसेच उपप्राचार्य डॉ. रावसाहेब बारोटे, पदव्युत्तर समन्वयक डॉ. शत्रुघ्न भोरे आणि राज्यशास्त्र विभाग प्रमुख व प्रमुख वक्ते डॉ. लेखाचंद मेश्राम यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

कार्यक्रमाच्या मुख्य सत्रात संविधान दिनानिमित्त आयोजित व्याख्यानात डॉ. लेखाचंद मेश्राम यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांना संविधान दिनाचा इतिहास, महत्त्व आणि उद्देश यांबाबत सखोल मार्गदर्शन केले. त्यानंतर उपस्थितांनी संविधानाच्या उद्देश पत्रिकेचे सामूहिक वाचन करून भारतीय लोकशाही मूल्यांप्रती निष्ठा व्यक्त केली.

 

कार्यक्रमाला महाविद्यालयाचे कनिष्ठ विभाग प्रमुख डॉ. उल्हास पाटील, एनएसएसचे कार्यक्रम अधिकारी डॉ. पंकज गावीत, डॉ. सुनील चौधरे, तसेच महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. निलेश गावडे यांनी केले, तर आभारप्रदर्शन डॉ. सुनील चौधरे यांनी मानले.

 

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, कार्यक्रम अधिकारी डॉ. निलेश गावडे, डॉ. पंकज गावित, डॉ. सुनील चौधरे, डॉ. श्रीकृष्ण परिहार आणि महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.