चोपडा महाविद्यालयात ‘विद्यापीठस्तरीय वार्षिक नियतकालिक अंक स्पर्धेतील’ विजेत्या विद्यार्थ्यांचा सत्कार

चोपडा महाविद्यालयात ‘विद्यापीठस्तरीय वार्षिक नियतकालिक अंक स्पर्धेतील’ विजेत्या विद्यार्थ्यांचा सत्कार

चोपडा: येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी.पाटील महाविद्यालयाच्या ‘शरभंग’ या नियतकालिकाला कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्यातर्फे आयोजित ‘विद्यापीठस्तरीय वार्षिक नियतकालिक अंक स्पर्धेत’ एकूण ०५ पारितोषिके प्राप्त झाली. या स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांच्या ‘सत्कार समारंभाचे’ आयोजन करण्यात आले होते. या सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ऍड. संदीप सुरेश पाटील हे होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच्या सचिव डॉ.सौ.स्मिताताई संदीप पाटील तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी व महाविद्यालयाचे समन्वयक डॉ.एस.ए.वाघ आदि मान्यवर उपस्थित होते. ‘कष्टकरी शेतकरी’ या संकल्पनेवर आधारित साक्षी सुधाकर पाटील या विद्यार्थिनीने काढलेल्या मुखपृष्ठ चित्रास प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले आहे. ‘शरभंग’ या वार्षिक नियतकालिक अंकास उत्कृष्ट मांडणीचे तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले असून कीर्ती राजेंद्र नेवे या विद्यार्थिनीला उत्कृष्ट मराठी कवितेचे द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. प्रियंका दिलीप पावरा या विद्यार्थिनीने उत्कृष्ट इंग्रजी वैचारिक लेख लिहून प्रथम क्रमांक पटकावला तर पाटील माधुरी वासुदेव या विद्यार्थिनीने उत्कृष्ट हिंदी संशोधन लेख लिहून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले आहे. या सर्व विजेत्या विद्यार्थ्यांना तसेच संपादक मंडळातील सर्व सदस्यांना संस्थेचे अध्यक्ष ऍड.संदीप सुरेश पाटील, संस्थेच्या सचिव डॉ.सौ.स्मिताताई संदीप पाटील तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.ए. सूर्यवंशी यांच्या हस्ते गौरविण्यात आले. या स्पर्धेत विजेत्या सर्व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेऊन मिळवलेल्या यशाबद्दल तसेच ‘शरभंग’ नियतकालिक अंक संपादक मंडळाने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल संस्थेचे अध्यक्ष ऍड. संदीप सुरेश पाटील यांनी कौतुक व अभिनंदन केले.
या कार्यक्रमाप्रसंगी ‘शरभंग’ वार्षिक नियतकालिक अंक संपादक डॉ.एम.एल.भुसारे, संपादक मंडळ सदस्य डॉ.ए.बी.सूर्यवंशी, डॉ. के. एस.भावसार, आय.क्यू. एस. सी. चे समन्वयक डी.एस.पाटील, डॉ.ए.एच.साळुंखे,डॉ. एच. जी. चौधरी, एस.बी. पाटील, एस. आर.पाटील आदि उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संपादक मंडळ सदस्य एस.बी.पाटील यांनी केले तर आभार एन. एस.शिरसाठ यांनी मानले.
या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयातील शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.