पाचोऱ्यात विधी सेवा समिती व वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने “महिलांची सुरक्षितता व गोपनीयता” या विषयावर मार्गदर्शन
( पाचोरा प्रतिनिधी जनलक्ष्य न्यूज )
पाचोरा शहरात बुऱ्हानी स्कूल येथे विधी सेवा समिती तसेच वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने महिलांची सुरक्षितता व गोपनीयता या विषयावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले यावेळी विध्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थिती होते या कार्यक्रमला माननीय प्रमुख पाहुणे यांनी मार्गदर्शन करत विविध उपयोजना सांगितले यावेळी, श्री निमसे साहेब यांच्या निर्देशा नुसार समात्तर विधी सहाय्य्क, (plv) प्रा. डॉ.सुनिता गुंजाळ मांडोळे यांनी समाजातील महिलांची सुरक्षितता व गोपनीयता या विषयावर सखोल मार्गदर्शन केले.
डॉ. मुकेश नेनाव, सौ ललिता पाटील, प्रा. व्ही.बी. बोरकर यांनी कामाच्या ठिकाणी महिलांवरील अत्याचार याविषयी मार्गदर्शन केले.श्री विसपुते अँड.भाग्यश्री महाजन यांनी पोक्सो कायदा सांगितला रवींद्र ब्राह्मणे अँड. अंकुश कटारे, यांनी विधी सेवा समितीचे कार्य सांगितले.
बुऱ्हानी शाळेच्या चेअरमन श्री कपाशी साहेब अध्यक्षस्थानी होते.या कार्यक्रम यशस्वरित्या करता प्राचार्य सह संपूर्ण स्टॉपचे सहकार्य लाभले.