Home महाराष्ट्र अहिल्यादेवी होळकर यांची ३००वी जयंती उत्सव शेवगाव पाथर्डी तालुक्यासह संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात...

अहिल्यादेवी होळकर यांची ३००वी जयंती उत्सव शेवगाव पाथर्डी तालुक्यासह संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात साजरी

अहिल्यादेवी होळकर यांची ३००वी जयंती उत्सव शेवगाव पाथर्डी तालुक्यासह संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात साजरी

 

(सुनिल नजन “चिफब्युरो”स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती शेवगाव पाथर्डी तालुक्यासह संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.शेवगाव तालुक्यातील माळेगाव, ताजनापूर,शेवगाव शहर,पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव,जवखेडे, मीरी, पाथर्डी शहर,या ठिकाणी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.कासार पिंपळगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात अहिल्यादेवीच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.जेष्ठ नेते सोपानराव तुपे, अप्पासाहेब राजळे,संभाजी राजळे, रामदास म्हस्के सर, सुधिर शेळके, तुषार तुपे, विठोबा जगताप, दादा पवार, ज्ञानदेव जगताप, तुपे साहेब यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.जवखेडे येथे ह.भ.प.कोरडे महाराज यांचे किर्तन झाले.मीरी येथे सवाद्य मिरवणूक काढण्यात आली होती‌.पाथर्डी आणि शेवगाव शहरातील प्रमुख मार्गावरून अहिल्या देवसवाद्य मिरवणूक काढण्यात आली होती.माळेगाव येथे जेष्ठ नेते जगन्नाथ गावडे यांच्या हस्ते राजमातेची महापुजा करण्यात आली.ताजनापूर येथे भव्यदिव्य अशीही मिरवणूक काढण्यात आली होती.अहिल्यादेवीचे जन्म स्थान जामखेड तालुक्यातील चौंडी येथे ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परीषदेचे सभापती ना.राम शिंदे , भाजपच्या हॅट्ट्रिक आमदार मोनिकाताई राजळे यांच्या उपस्थितीत अहिल्यादेवीचा त्रिशब्दी जयंती सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला.

Don`t copy text!