माजी मंत्री स्व.के.एम. पाटील यांना ज्ञानमर्मी स्मृती जीवन गौरव सन्मान

माजी मंत्री स्व.के.एम. पाटील यांना ज्ञानमर्मी स्मृती जीवन गौरव सन्मान

 

 

माजी मंत्री स्व.के.एम. पाटील यांना ज्ञानमर्मी स्मृती जीवन गौरव सन्मान >> जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्राला योगदान दिलेल्यांच्या स्मृतींना ग्रामगौरव फाउंडेशनने दिला उजाळा पाचोरा : ग्रामगौरव फाउंडेशनच्या तृतीय वर्धापनदिनानिमित्त शिक्षण व सहकार क्षेत्रात भरीव योगदान असलेले माजी मंत्री स्व. के. एम. बापू पाटील यांना कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू तथा ज्येष्ठ कृषी व जलतज्ज्ञ डॉ.शंकरराव मगर यांच्या शुभहस्ते ज्ञानमर्मी स्मृती जीवन गौरव सन्मान प्रदान करण्यात आला. समारंभाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत व अर्थतज्ञ तथा विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी हे होते. जळगाव जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात मोठे काम उभारणाऱ्या महनीय व्यक्तींच्या व संस्थांच्या कामाला उजाळा मिळण्याच्या उद्देशाने ज्ञानमर्मी सन्मान सोहळ्याचे आयोजन होते.सर्व सन्मान झालेल्या शिक्षण पंढरीच्या वारकऱ्यांची प्रेरणागाथा म्हणून काढण्यात येणाऱ्या ‘ज्ञानमर्मी’ विशेषांकाच्या मुखपृष्ठाचे सुद्धा यावेळी अनावरण करण्यात आले.जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन भवनात झालेल्या या देखण्या सोहळ्याला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद,जिल्हा दूध संघांचे चेअरमन आ.मंगेशदादा चव्हाण जिल्हा परिषदेचे सीईओ अंकित, डायटचे प्राचार्य डॉ.अनिल झोपे,उच्च शिक्षण विभागाचे उपसंचालक डॉ. कपिल सिंघेल,माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीमती कल्पना चव्हाण,जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने,प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील,मधुस्नेह संस्था परिवाराचे धनंजय चौधरी,ज्येष्ठ पत्रकार सुरेश उज्जैनवाल,जैन उद्योग समूहाचे जनसंपर्क विभागाचे उपाध्यक्ष अनिल जोशी,इकरा संस्थेचे अध्यक्ष डॉ.करीम सालार, उद्योजक रवींद्र नवाल आदी मान्यवर उपस्थित होते. जिल्ह्याचे शिक्षण व सहकार महर्षी ठरलेले के.एम.बापू पाटील यांचा हा मरणोत्तर सन्मान त्यांचे नातू अँड.जयदेव दादा पाटील यांनी स्वीकारला.बापूंचे चिरंजीव श्री अनिल कृष्णराव व मालती अनिल पाटील हे सुद्धा समारंभला उपस्थित होते.