नगरच्या माळीवाडयातील शंकरसावली मठातील चोराने दिलेल्या माहितीनुसार कासार पिंपळगावातील दोन नंबरवाले जिल्हा (LCB) पोलीसांच्या रडारवर
(सुनिल नजन “चिफब्युरो”स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) नगर शहरातील माळीवाड्याच्या ब्राह्मण गल्लीतील शंकर सावली मठातील चोराने दिलेल्या माहितीनुसार कासार पिंपळगावातील दोन नंबरवाले अहिल्या नगर जिल्हा पोलीसांच्या रडारवर आले आहेत. या बाबतची माहिती अशी की नगर शहरातील माळीवाड्याच्या ब्राह्मण गल्लीतील शंकर सावली मठातील बाबांच्या गळ्यातील चांदीची चैन,चांदीचा टाक, रुद्राक्ष असलेली चांदीची माळ कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याबाबद कोतवाली पोलिस स्टेशनला कमलेश लक्ष्मण जंजाळे ,राहणार, ब्राह्मण गल्ली, माळीवाडा, अहिल्या नगर यांनी दिनांक 14 मे रोजी गुन्हा दाखल केला होता.त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अहिल्या नगर शहरातील कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 467/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे सुधारीत कलम 305 प्रमाणे अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.जिल्हा पोलिस अधीक्षक राॅकेशजी ओला साहेब,अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे,नगर शहर डी.वाय.एस.पी.अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रतापराव दराडे यांच्या सुचनेनुसार गुन्हा शोध अन्वेषण विभागाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिताताई कोकाटे, महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल रोहीणी दरंदले,पोलिस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र औटी, संदिप पितळे, विशाल दळवी,पो.काॅं.दिपक रोहोकले, तानाजी पवार,सुरज कदम, शिरीष तरटे, दत्तात्रय कोतकर,राम हंडाळ, सचिन लोळगे, सोमनाथ केकाण, महेश पवार, सोमनाथ राउत, महीला पोलिस काॅंन्स्टेबल प्रतिभा नागरे,यांच्या पथकाला या चोरीच्या तपासासाठी वरीष्ठांनी आदेश देऊन कामाला लावले होते. या बाबत मिळालेली माहिती अशी की मंगळवार दिनांक 13 मे 2025 रोजी सकाळी साडेदहा ते 10.40 वजण्याच्या दरम्यान नगर शहरातील माळीवाड्यच्या ब्राह्मण गल्ली परीसरातील शंकर सावली मठातील 13 हजार रुपये किंमतीची बाबांच्या गळ्यातील चांदीच्या दागिन्यांची चोरी झाली होती.पोलीसांनी ब्राह्मण गल्ली परीसरातील खाजगी घरावर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांतील फुटेज तपासले असता त्या मध्ये रुपेश दादासाहेब खोजे (वय34वर्षे), राहणार-कासार पिंपळगाव,तालुका -पाथर्डी,जिल्हा अहिल्यानगर हा दिसुन आला होता. मग पोलिस निरीक्षक प्रतापराव दराडे यांनी या गुन्ह्यातील आरोपीच्या तपासासाठी गुन्हे अन्वेषण विभागाच्या शोध पथकाला या चोरीच्या तपासासाचे आदेश दिले. तो पर्यंत संशयित आरोपीची गुन्हे शोध पथकाने सर्व प्रकारची माहिती मिळवली होती.त्या नुसार गुन्हे शोध पथकाने त्या परीसरात सापळा लावून सदर सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेजमध्ये दिसणाऱ्या या इसमाला ताब्यात घेतले होते.आणि त्यांचे नाव गाव पत्ता विचारला असता त्यांनी वर नमूद केलेले नाव गाव सांगितले होते. मग त्याच्याकडे शंकर सावली मठातील चोरीच्या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने माहिती विचारली असता त्यानें प्रथम पोलीसांना उडवाउडवीची उत्तरे दिली.पोलीसांनी मग त्याला पोलीसी खाक्या दाखवून चांगलेच चौदावे रत्न दाखवले होते.मग तो सुतासारखा सरळ झाला.मग पोलिसांनी त्याला चांगले विश्वासात घेऊन खोदुन खोदून चौकशी करून माहिती विचारली असता त्यानें पोलीसांच्या माराला भिऊन मठातील बाबांच्या गळ्यातील चांदीची चैन, चांदीचा टाक, रुद्राक्ष असलेली चांदीची माळ इत्यादी दागिने चोरी केल्या बाबद पोलिसांना कबुली जबाब दिला. मग त्याच्या कडून एकुण 13 हजार रुपये किंमतीचे चोरीला गेलेले सर्व दागिने पोलीसांनी हस्तगत केले.मग त्याला अजून किती वेगवेगळ्या ठिकाणी चोऱ्या केल्या आहेत त्या तपासासाठी पोलिस कोठडी देण्यात आली आहे. या चोरी व्यतिरिक्त त्याने अजूनही कोणकोणत्या ठिकाणी चोऱ्या केल्या आहेत या बाबद पोलिस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र औटी हे पुढील तपास करीत आहेत. कासारपिंपळगाव परीसरात झालेल्या अनेक चोऱ्यांची आणि सुरू असलेल्या अवैध धंदयाची माहिती त्याने जिल्हा पोलिसांना दिली आहे. त्यामुळे कासार पिंपळगावातील अनेक म्होरके पोलीसांच्या हीटलीस्टवर आले असून त्यांचीही लवकरच पोलखोल करण्यात येणार आहे.असे गुन्हे शोध तपास पथकातील पोलीसांनी सांगितले. सदर आरोपीच्या साथीदारांचा पोलिस शोध घेत आहेत.त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत.पाथर्डी तालुक्यातील व्रुध्देश्वर, हनुमान टाकळी,लोहसर खांडगाव,देवीचे धामणगाव येथील मंदिरातही चोऱ्या झालेल्या आहेत.त्या अनुषंगाने ही काही माहिती मिळते का याची कसून चौकशी करून पोलिस शोध घेत आहेत.