शेअर मार्केटच्या नावाखाली ६२ लाखाची फसवणूक करणाऱ्या ह.भ.प.गणेश डोंगरे च्या शेवगाव पोलिसांनी मुसक्या आवळून केले गजाआड
(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) शेअर मार्केटच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या ह.भ.प. गणेश महाराज डोंगरेच्या शेवगाव पोलिसांनी मुसक्या आवळून गजाआड केले आहे. या बाबतची माहिती अशी की दिनांक ३१जुलै२०२५ रोजी अहिल्या नगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील ठाकूर निमगाव येथील गहिनीनाथ पंढरीनाथ कातकडे वय वर्षे (५८) यांनी शेवगाव पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत असे नमूद केले होते की शेवगाव शहरातील आखेगाव रोडवर शेअर मार्केट ट्रेडिंग कंपनी या नावाने विठ्ठल संपर्क कार्यालय उघडण्यात आले होते.तेथे कंपनीच्या नावाखाली फिर्यादी आणि इतर साक्षीदार व अनेक गोरगरिबांचा विश्वास संपादन करून जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून लोकांकडून लाखो रुपयांची उलाढाल करुन लोकांची फसवणूक केली आहे.अशा आशयाची फिर्याद दाखल केली होती.गुन्हा रजिस्टर नंबर ६६७/२०२५ कलम,४२०,४०९,४०६, महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थांमधील हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम १९९९चे कलम ३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. शेवगाव पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना गुप्त खबऱ्या मार्फत माहिती मिळाली होती की नमूद गुन्ह्यातील संशयित आरोपी गणेश बप्पासाहेब डोंगरे (वय४०) राहणार काटे वस्ती आखेगाव तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर हा त्याच्या रहात्या घरात पाठीमागच्या खोलीत गाढ झोपलेला आहे.अशी माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी दोन पोलिस पथके तयार करून त्याचा शोध घेण्यासाठी पाठवले असता नमूद गुन्ह्यातील संशयित आरोपी हा पोलीसांची चाहूल लागताच पळून जात असताना पोलीस पथकाने त्याचा पाठलाग करत मोठ्या शिताफीने रंगेहाथ पकडले. दि.१ऑगष्ट २०२५ रोजी पहाटे ताब्यात घेऊन या संशयित आरोपीस शेवगाव पोलिस स्टेशनला आणून नमूद गुन्ह्यात अटक करून त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावलेली आहे. वरील आरोपींकडून कोणाचीही फसवणूक झाली असल्यास त्यांनी शेवगाव पोलिस स्टेशनला बिनधास्तपणे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.सदरची कारवाई ही अहिल्यानगर जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे साहेब आणि अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, शेवगावचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शेवगाव पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे साहेब, पोलिस सब इन्स्पेक्टर बाजीराव सानप, पोलिस हेड कॉन्स्टेबल किशोर काळे, पोलिस कॉन्स्टेबल शाम गुंजाळ, भगवान सानप, ईश्वर बेरड,राजू बडे, सचिन पिरगळ, एकनाथ गर्कळ, प्रशांत आंधळे आणि अहिल्या नगर दक्षिण सायबर सेलचे पोलिस काॅंन्स्टेबल राहुल गुड्डू यांच्या पोलिस पथकाने केली आहे.वरील गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस सब इन्स्पेक्टर बाजीराव सानप हे करीत आहेत.शेवगाव तालुक्यातील अनेक गावांत शेअर मार्केटच्या नावाखाली अनेक भामट्यांनी सर्व सामान्य लोकांना गंडा घालून चांगलाच धुमाकूळ घातला आहे.परंतू पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे साहेब हे जेव्हा पासून शेवगाव पोलिस स्टेशनला हजर झाले आहेत तेव्हा पासून शेअर मार्केट घोटाळ्यातील अनेक म्होरके त्यांनी गजाआड केले आहेत तर काही मासे पोलिसांच्या गळाला न लागल्याने अजूनही तालुक्यातून फरार होण्यात यशस्वी झालेले आहेत.लवकरच सर्व फरारी भामटे गजाआड होणार असा विश्वास शेवगाव पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे साहेब यांनी व्यक्त केला आहे.

























