गाय कापनारा पेक्षा गाय कसाबाला विकणाराच खरा पापी : महंत आदिनाथ महाराज शास्त्री
(सुनिल नजन चिफब्युरो स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) गाय कापनारा पेक्षा कसाबाला गाय विकणाराच खरा पापी आहे असे उदगार तारकेश्वर गडांचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांनी काढले ते अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा येथे हनुमान, शनि,गणपती, मंदिराच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहातील काल्याच्या किर्तना प्रसंगी बोलत होते. दिनांक १६ ते २० जानेवारी २०२६ या कालावधीत हा अखंड हरिनाम सप्ताह साजरा झाला.या सप्ताहात सर्व ह.भ.प.हरीश्चंद्र महाराज दगडखैर, नामदेव महाराज पोकळे,श्रीराम महाराज मचे, ईश्वर महाराज कदम यांची किर्तने झाली. महंत आदिनाथ महाराज शास्त्री पुढे म्हणाले की आई वडिलांची सेवा केली की रामराज्य आलंच पाहिजे पण काही लोक आई वडिलांना वृद्धाश्रमात पाठवतात ही खरी वस्तुस्थिती आहे. मुस्लिमांना नावे ठेवली जातात पण नगर तालुक्यातील खोसपुरी येथे मुस्लिम लोकच हींदू देव देवतांचा सप्ताह आयोजित करतात आणि अखंड हरीनाम सप्ताहात पंगती देतात हे आवर्जून सांगावेसे वाटते.याचे हींदू बांधवांनी चांगले आकलन केले पाहिजे.गोमातेची सेवा केली की अनेक प्रकारचे आजार बरे होतात हा माझा अनुभव आहे.माझ्या रक्तातील साखर चारशेच्या आसपास होती परंतु मी सतत गाईच्या पाठीवरून हात फिरवत होतो माझी साखर कायमचीच कमी झाली आहे.तुम्ही गावरान गायांची सेवा करून अनुभव घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.त्यांनी गोमातेच्या सेवे संदर्भातील अनेक पैलू सांगून उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.यावेळी भाऊसाहेब मतकर,अर्जुन देशमुख,रामभाऊ नेहुल यांनी नर्मदा परिक्रमा पूर्ण केली म्हणून त्यांचा महाराजांच्या हस्ते सन्मान केला.ह.भ.प. श्रीरंग महाराज तळेकर,आणि वृद्धेश्वर साखर कारखान्याचे माजी चेरमन उद्धवराव वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.हनुमान नाना चितळे सर यांच्या काल्याच्या महाप्रसादाच्या पंगतीने या सोहळ्याची सांगता झाली.या सप्ताहात अनेक भाविकांनी अन्न दान केले.या सोहळ्यासाठी जेष्ठ नेते पोपटराव आंधळे,नामदेव सरगड,राजेंद्र मतकर सर,शिवाजीराव मतकर,विष्णूपंत घाटुळ,दगडू आंधळे दुकानदार, बाबासाहेब सरगड,संभाजी वाघ,हिराजी मतकर, बाबासाहेब महाराज मतकर, सरपंच चारूदत वाघ,वैभव आंधळे,अण्णा तळेकर,आबाजी महाराज आंधळे, डॉक्टर चितळे, प्रल्हाद आंधळे, उत्तमराव आंधळे,घनशाम नेहुल,शिवाजी जाधव,धर्माजी भोसले,संभाजी भोसले हे आवर्जून उपस्थित होते.जवखेडे खालसा येथे नवीन बांधलेल्या मंदिराच्या वास्तूचे शास्त्री महाराजांनी कौतुक केले.या सांगता सोहळ्यास पंचक्रोषीतील अनेक भाविक भक्त गण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

























