अखिल महाराष्ट्र गाडी लोहार विकास महासंघ तर्फे शाहीर विनोद ढगे यांना पुरस्कार

अखिल महाराष्ट्र गाडी लोहार विकास महासंघ तर्फे शाहीर विनोद ढगे यांना पुरस्कार

जळगांव ( प्रतिनिधी )

जालना येथे अखिल महाराष्ट्र गाडी लोहार समाज विकास महासंघतर्फे गुणगौरव व पुरस्कार वितरण सोहळा २०२२ संपन्न झाला असून या सोहळ्यात जळगांव येथिल शाहीर विनोद ढगे यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.शाहीर विनोद ढगे यांच्या कलेचा आदर करत त्याच्या कार्याची दखल घेत पुरस्कार प्रदान करण्यात आला.महासंघाचे अध्यक्ष श्री सदाशिवराव हिवलेकर तसेच निवृत्त जिल्हाधिकारी भारत सासणे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.