पाचोऱ्यातील कन्या लखनऊ येथे उत्तर प्रदेश निवडणुकीची धुरा सांभाळणारी काँग्रेसचे हायकमांड प्रियंका ताई गांधी यांच्यासोबत दिलखुलास चर्चा करताना अनुष्का मिश्रा

पाचोरा येथील कन्या लखनऊ येथे उत्तर प्रदेश निवडणुकीची धुरा सांभाळणारी काँग्रेसचे हायकमांड प्रियंका ताई गांधी यांच्यासोबत दिलखुलास चर्चा करताना अनुष्का मिश्रा

लखनऊ येथून पाचोरा येथे साधारणता सत्तर वर्षापूर्वी पाचोरा शहरात गांधी चौकात रहिवासी असलेले स्वर्गीय श्री प्रफुल चंद्रा मिष्रा आपल्या परिवार सह पाचोरा येथे रहिवास केला त्यांनी एक छोटेसे भांड्याचे दुकान चालू करून आपला उदरनिर्वाह सुरू केला त्यांना तीन मुलं व एक मुलगी असा परिवार असून त्यांनी मुलांना मुलींना शिकून उच्चशिक्षित केले तसेच त्यांची दोन मुलं राजन व अनुराग यांनी वडिलांचा भांड्याचा व्यवसाय चालू ठेवला तसेच अनिल हा कॉम्प्युटर व्यवसायात उतरून काही दिवस त्याने पाचोरा शहरात उत्कृष्ट पद्धतीचे कम्प्युटर क्लासेस चालविले त्या माध्यमातून त्यांनी पाचोरा शहरात कम्प्युटर क्लासेस च्या माध्यमातून अनेक शालेय विद्यार्थ्यांना कॉम्प्युटरचे ज्ञान देऊन व माहिती देऊन त्यांना त्यात मार्गदर्शन केले तसेच त्यानंतर अनिल मिश्रा याने आपले मूळ गाव उत्तर प्रदेश मध्ये लखनऊ येथील वास्तव करून त्या ठिकाणी क्लिप फोटो कलर लॅब हा व्यवसाय खोलून विद्यार्थ्यांना ज्ञान दिले आजही त्याचे लखनऊमध्ये व्यवसाय सुरू आहे त्यांच्याकडे त्याचे मोठे भाऊ राजन मिश्रा यांची मुलगी शिक्षणासाठी लखनऊ येथे आले असता सध्या उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीचे जोरदार वारे वाहू लागले असून मतदानाची प्रक्रिया सुरू आहे या निवडणुकी दरम्यान अनेक मातब्बर प्रचाराला येत असून काँग्रेसच्या हायकमांड प्रियंका गांधी या उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर असताना त्यांनी लखनऊमध्ये आपला घरोघरी पाई प्रचार सुरू केला आहे त्या दरम्यान त्यांनी युवती यांच्याशी संपर्क साधून युवतींना जास्तीत जास्त प्राधान्य दिले त्यात त्यांनी पाचोरा येथील कन्या अनुष्का मिश्रा यांच्याशी चर्चा केली व प्रियंका ताई गांधी यांनी अनुष्का मिश्रा या तरुणीस गोल आकाराचे ब्रेसलेट देऊन (लडकी हु लढ सकती हु )असा संदेश देऊन युवतींचे उत्साह वाढवला.पाचोरा च्या कन्यानी उत्तर प्रदेशातही आपला महाराष्ट्राचा ठसा उमटवला…