पाचोरा येथील सेवानिवृत्त मुख्यायध्यापक श्री.यादव विठ्ठल शिनकर यांना श्री.एस.एम.जोशी पुरस्का‍र सन्मानित

पाचोरा येथील सेवानिवृत्त मुख्यायध्यापक श्री.यादव विठ्ठल शिनकर यांना श्री.एस.एम.जोशी पुरस्का‍र सन्मानित

श्री. यादव विठ्ठल शिनकर, (सेवानिवृत्त मुख्यायध्यापक) कोषाध्यक्ष, पाचोरा, जि.जळगाव यांना पुणे शहर निवृत्त महासंघ(फेडरेशन) यांचे तर्फे श्री.एस.एम.जोशी पुरस्का‍र सन 2022-23 साठी प्राप्त झाला. सेवा निवृत्तांसाठी काम करणा-या महाराष्ट्रातील एका व्यक्तीास मानाचा श्री.एस.एम.जोशी पुरस्कार वितरण समारंभ शुक्रवार दि.16 डिसेंबर 2022 रोजी विशाल सह्याद्री ट्रस्ट्चे सभागृह, सदाशिव पेठ, पुणे येथे डॉ.अभिजित वैद्य सो. प्रमुख पाहुणे श्री.लक्ष्मीकांत देशमुख सो. माजी जिल्हाधिकारी कोल्हापूर, माजी अध्यक्ष अखील भारतीय मराठी साहित्य संमेलन यांचे हस्ते देण्यात आला व सपत्निक सत्कार करण्यात आला. त्यांनी शैक्षणिक, सामाजिक व राष्ट्रीय क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केल्याबद्दल त्यांना मानाचा श्री.एस.एम.जोशी पुरस्कार प्रदान करण्यात आला.