शिवसेना नेत्या वैशाली सुर्यवंशी यांचा वाढदिवस शिवसैनिकांच्या उपस्थितीत जल्लोषात साजरा

शिवसेना नेत्या वैशाली सुर्यवंशी यांचा वाढदिवस शिवसैनिकांच्या उपस्थितीत जल्लोषात साजरा

आज दि.२३ डिसेंबर २०२३ रोजी पाचोरा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवतीर्थ कार्यालयात शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या वैशालीताई सुर्यवंशी यांचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला आहे. प्रथमतः अंतुली येथील विठ्ठल मंदिरात ताईच्या हस्ते पूजा व आरती करण्यात आली त्यानंतर संपूर्ण गावाने ताईला शुभेच्छा दिल्या. नंतर निर्मल इंटरनॅशनल स्कूल आणि निर्मल सीड्स कंपनी येथे तात्यासाहेब आर. ओ.पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन करून ताईंनी आशीर्वाद घेतला व सर्व कर्मचाऱ्यांकडून शुभेच्छा स्वीकारून त्यानंतर ताईसो जैन स्नातक येथे जाऊन मुनीवर यांचा आशीर्वाद घेतला व श्रीराम मंदिर पाचोरा येथे पूजा व महाआरती करण्यात आली त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत “जय भवानी जय शिवाजी” चा नारा लावत “वैशाली ताई तुम आज बढो हम तुम्हारे साथ है!” अशा विविध घोषणांनी ताईंना तमाम परिसरातील नागरिकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. महामाहीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले आहे. वैशाली ताई यांची मिरवणूक काढून स्टेशन रोड वरून छत्रपती शिवाजी महाराज चौकातील महादेव मंदिरावर पूजा अर्चना करून कार्यालयावर वाढदिवसानिमित्ताने रक्तगट तपासणी शिबिराचे आयोजन देखील करण्यात आले होते यामध्ये अनेकांनी आपल्या रक्ताची तपासणी देखील करून घेतली आहे. तदनंतर सर्व शिवसेना युवा सेना पदाधिकारी, महिला पदाधिकारी तसेच तमाम शिवसैनिकांच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला आहे. यावेळी पाचोरा येथील ठाकरे गटाचे समस्त पदाधिकारी, शिवसैनिक,कार्यकर्ते,महिला आघाडीच्या पदाधिकारी तसेच परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती.