श्री गो से हायस्कूल येथे संविधान दिन उत्साहात साजरा

श्री गो से हायस्कूल येथे संविधान दिन उत्साहात साजरा

पाचोरा ( प्रतिनिधी)
गो से हायस्कूल मधील विद्यार्थी व शिक्षकांनी संविधान दिन उत्साहात साजरा केला. संविधान दिनानिमित्त शाळेत चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा व प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात आली. सदर स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. शाळेतील शिक्षक उज्वल पाटील. यांनी संविधान निर्मिती व संविधानाची वैशिष्ट्य आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना स्पष्ट करून सांगितले. ज्येष्ठ शिक्षक बी .एस. पाटील. यांनी विद्यार्थ्यां समवेत सामूहिक उद्देशिकेचे वाचन केले करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांची संविधान जनजागृती रॅली भडगाव रोड व पुनगाव रोड मार्गे काढण्यात आली याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका प्रमिला एम वाघ, उपमुख्याध्यापक एन .आर. ठाकरे. पर्यवेक्षक आर. एल. पाटील.
ए. बी. अहिरे. सांस्कृतिक विभाग प्रमुख आर. बी. तडवी. तांत्रिक विभाग प्रमुख एस. एन. पाटील. किमान कौशल्य विभाग प्रमुख मनीष बाविस्कर. कार्यालय अधीक्षक अजय सिनकर .तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. याप्रसंगी तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत नैपुण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.