PBN महाराष्ट्र न्युज चे उद्घाटन डॉ निळकंठ पाटील यांच्या हस्ते संपन्न

PBN महाराष्ट्र न्युज चे उद्घाटन डॉ निळकंठ पाटील यांच्या हस्ते संपन्न जनलक्ष्य तर्फे लक्ष लक्ष शुभेच्छा

पाचोरा-
आज दिनांक ७ सप्टेंबर 2023 रोजी गोकुळाष्टमी चे औचित्य साधून पाचोरा भडगाव मतदार संघा सह महाराष्ट्रभर PBN महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल स्वरूपात नवीन इलेक्ट्रॉनिक असे न्यूज प्रसार माध्यम जनतेच्या सेवेसाठी पाचोरा शहरातील वृंदावन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक तथा पाचोरा बाजार समितीचे संचालक डॉक्टर निळकंठ पाटील यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले.

पत्रकार कुंदन बेलदार हे गेल्या तीन चार वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. आज रोजी कुंदन बेलदार यांनी स्वतः चे न्युज चॅनल सुरू केले आहे. पत्रकार बंधूंच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले, लोकार्पण करतेवेळी डॉक्टर निळकंठ पाटील म्हणाले की, सदर न्युज चॅनल जनतेच्या निस्वार्थ सेवेसाठी 24 तास हजर राहणार असून मुख्य संपादक कुंदन बेलदार यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या, यावेळी पत्रकार बांधव, हॉस्पिटल स्टाफ, हितचिंतकांची उपस्थिती होती.