आमदारांच्या नाकर्तेपणामुळे पाचोरा तालुका वंचित- अमोल शिंदेचा घणाघात

भडगावला 8 कोटी पीकविमा रक्कम जमा होण्यास सुरवात,-

———————————————————

आमदारांच्या नाकर्तेपणामुळे पाचोरा तालुका वंचित- अमोल शिंदेचा घणाघात

पाचोरा-
प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत राज्य सरकारने लागू केलेल्या सर्व समावेशक पिक विमा योजना ज्यामध्ये शेतकऱ्यांनी १/- रुपया भरून आपल्या खरीप हंगामातील कापूस,उडीद, मूग,सोयाबीन,मका,ज्वारी, बाजरी इ. पिकांचा विमा काढला होता.त्या अनुषंगाने पाचोरा व भडगाव तालुक्यात सरासरी प्रजन्यमान फार कमी झाले होते.तसेच जुलै व ऑगस्ट महिन्यामध्ये पाचोरा व भडगाव तालुक्यात 21 दिवसांपेक्षा जास्त दिवस पावसाचा खंड पडल्याने शेतकऱ्यांची पिके पूर्णपणे वाया जातील हे निदर्शनास येताच भारतीय जनता पार्टीचे विधानसभा निवडणूक प्रमुख अमोल शिंदे यांनी पाचोरा व भडगाव तालुक्यातील पिक विमाधारक शेतकऱ्यांना पिक विम्याच्या 25% अग्रीम रक्कम नुकसान भरपाई पोटी मिळावी अशी मागणी प्रथमतः मा.जिल्हाधिकारी, जिल्हा कृषी अधीक्षक व प्रांताधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती.
तसेच राज्याचे मंत्री ना.गिरीष महाजन यांच्या माध्यमातून शासन स्तरावर सतत पाठपुरावा करत पाचोरा व भडगाव तालुक्यातील पिक विमा धारक शेतकऱ्यांना पिक विम्याच्या 25% अग्रीन रक्कम मिळावी ही मागणी लावून ठेवली होती.आणि पिक विम्याच्या शासन निर्णयानुसार सलग २१ दिवस पावसाचा खंड (२.५ mm पेक्षा कमी पाऊस)पडल्यास शेतकऱ्यांना पिक विम्याची २५% आगाऊ नुकसान भरपाई देय असल्याने त्या अनुषंगाने मंत्री ना.गिरीश महाजन यांनी त्यांच्या मुंबई येथील सेवासदन या शासकीय निवासस्थानी दि १८ ऑक्टोबर २०२३ रोजी मा.कृषिमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या समवेत झालेल्या बैठकीत जळगांव जिल्ह्यातील केळी पिक विमाच्या समस्यांसह सह पाचोरा व भडगाव आणि जिल्ह्यातील इतर पिक विमाधारक शेतकऱ्यांना 25% अग्रीम रक्कम नुकसानभरपाई पोटी मंजूर करून लवकरात-लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करावी यासंबंधी सकारात्मक चर्चा करण्यात आली होती.त्यामुळेच मागणीला व पाठपुराव्याला यश आले होते.
त्या अनुषंगाने भडगाव तालुक्यातील 3 महसूल मंडळ मधील 18,174 शेतकऱ्यांना 25 टक्के अग्रिम रक्कम नुकसान भरपाई पोटी मंजूर झालेले 8 कोटी 8 लाख 88 हजार 343 रुपये प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. काही शेतकऱ्यांच्या बँकखात्यात पैसे जमा झाल्याचे मॅसेज देखील दाखवलेत.आणि मंत्री गिरीष महाजन यांचे भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने आभार व्यक्त केले.
मात्र या नुकसानभरपाई पासुन पाचोरा तालुक्यातील जवळपास ४४००० पीकविमा धारक शेतकरी वंचित राहत असल्याची खंत देखील त्यांनी व्यक्त केली आहे.पाचोरा तालुक्यातील या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी देखील सतत पाठपुरावा व वरिष्ठ स्तरावर आग्रही मागणी लावून ठेवली होती.परंतु लोकप्रतिनिधी नसल्याने काही बंधने येतात व विधानभवन सारख्या ठिकाणी आवाज उठवता येत नाही.परंतु पाचोरा तालुक्यातील पीक विमा धारक शेतकऱ्यांसाठी अजून देखील आपले प्रयत्न सुरू असुन राज्याचे मंत्री गिरीष महाजन व संबंधित विभागाचे मंत्री यांच्याकडे सततचा पाठपुरावा सुरू आहे.
शेतकऱ्यांना यावर्षीच्या हंगामातून कुठलेही आर्थिक उत्पन्न मिळणार नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.कापसाला भाव नाही,उत्पन्नात घट झाली आहे.अशा परिस्थितीत नैराश्यातून शेतकऱ्यांच्या मनांत आत्महत्ये सारखे विचार येत आहेत.अशावेळी आपले आमदार शेतकऱ्यांन बाबत संवेदनशिल राहिले असते तर पाचोरा तालुक्यातील पिक विमाधारक शेतकऱ्यांना देखील नुकसान भरपाई मिळाली असती नुकत्याच झालेल्या नागपुर येथील हिवाळी अधिवेशनात आमदार किशोर पाटील हे पाचोरा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी आवाज उठवू शकले असते.परंतु त्यांना शेतकऱ्यांना मदत मिळवुन देण्यात स्वतःचा कुठलाच फायदा दिसत नव्हता म्ह्णून त्यांनी पाचोरा तालुक्यातील शेतकऱ्यासाठी ही तसदी घेतली नाही. ते फक्त स्वतःचा स्वार्थ व फायदा कुठे जपता येईल याच विषयावर विधानभवनात आवाज उठवतात अशा अकार्यक्षम,खोट बोलण्याऱ्या आणि निवळ थापा मारण्याऱ्या आमदारामुळे पाचोरा तालुक्यातील शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित रहावे लागत आहे. असा घनघात अमोल शिंदे यांनी यावेळी आमदार किशोर पाटील यांच्यावर केला.