श्री.सु.भा.पाटील विद्या मंदिरात स्वर्गीय आप्पासाहेब ओंकार नारायण वाघ यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ “रंगभरण स्पर्धा”

श्री.सु.भा.पाटील विद्या मंदिरात स्वर्गीय आप्पासाहेब ओंकार नारायण वाघ यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ “रंगभरण स्पर्धा”

 

पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री.सु.भा.पाटील विद्या मंदिरात पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे आधारवड स्वर्गीय आप्पासाहेब ओंकार नारायण वाघ यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ  “रंगभरण स्पर्धा” आयोजित करण्यात आली होती. प्रथमतः आप्पासाहेबांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून विद्यार्थ्यांना लोकनेते आप्पासाहेबांचा जीवनपट व कारगिर्द याबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक श्री.अशोक परदेशी सर,जेष्ठ शिक्षक-शिक्षिका यांच्या हस्ते बक्षिसे वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमच्या वेळी सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.