पाचोऱ्यात जय हिंद लेझीम मंडळ गतिरोधकासाठी रास्ता रोको आंदोलनाच्या पवित्र्यात

पाचोऱ्यात जय हिंद लेझीम मंडळ गतिरोधकासाठी रास्ता रोको आंदोलनाच्या पवित्र्यात

जळगाव-चांदवड महामार्गावरील भारत डेअरी बस स्टॉप ते पांडव नगरीपर्यंत गतिरोधक बसविण्याबाबत अंमलबजावणी न केल्याने उपविभागीय अधिकारी सो. पाचोरा भाग पाचोरा यांना जयहिंद क्रीडा व लेझीम मंडळ कृष्णापुरी यांच्या वतीने
दिनांक २५/०८/२०२३ रोजीच्या गतिरोधक बसविणे व इतर मागण्यांसाठी झालेले लाक्षणिक उपोषण व कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग, धुळे यांचे (जा.क्र.रेशा/गतिरोधक / १०१७/२०२३) या संदर्भिय पत्रानुसार निवेदन देण्यात आले होते
त्यात मंडळाच्या निवेदनात दिनांक २५/०८/२०२३ शुक्रवार रोजी वरील मागण्यांसाठी लाक्षणिक उपोषण केले होते. त्यात वरील संदर्भीत पत्रानुसार तसेच आपल्या तोंडी आश्वासनानुसार आपण लवकरात लवकर कारवाई करणार होतात. परंतु आज पावेतो कोणतीही कार्यवाही व अंमलबजावणी यावर झाली नाही. त्यामुळे आपण या विषयाकडे लक्ष घालून तातडीने अंमलबजावणी करावी जेणेकरून भविष्यातील होणाऱ्या अपघातात कोणतीही जीवितहानी किंवा अपंगत्व येऊ नये, म्हणुन स्मरण पत्र ही उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले होते त्या पत्रात यावर कोणत्याही प्रकारची अंमलबजावणी न झाल्यास जयहिंद क्रीडा व लेझीम मंडळ रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा प्रशासनास दिला होता.म्हणुन येत्या आठ दिवसांत यावर अंमलबजावणी न झाल्यास मंडळाकडून रास्तारोको आंदोलन करण्यावर मंडळ ठाम आहे अशी माहिती जयहिंद क्रीडा व लेझीम मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आली.