जिल्हा परिषद उर्दू कन्या शाळेत आ.किशोरआप्पा पाटील यांच्या हस्ते ग्रंथालयचे उद्घाटन

जिल्हा परिषद उर्दू कन्या शाळेत आ.किशोरआप्पा पाटील यांच्या हस्ते ग्रंथालयचे उद्घाटन

शिक्षणाच्या दर्जा वाढवण्यासाठी सतत प्रयत्न करणारी जिल्हा परिषद उर्दू कन्या शाळा पाचोरा येथे ग्रंथालयाच्या उद्घाटन पाचोरा भडगाव मतदार संघाचे आमदार माननीय किशोर आप्पा पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आला… यावेळी शाळेत कमी असलेल्या सोयी सुविधाची पूर्तता व शाळा डिजिटल व्हावी असे निवेदन शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष शेख जावेद शफी, मुख्याध्यापक अब्दुल एजाज अब्दुल रऊफ, पदवीधर शिक्षक शेख कदिर शब्बीर, शिक्षक शेख जावेद रहीम यांच्या व्दारे करण्यात आली. यावेळी शाळेच्या चांगला शैक्षणिक वातावरण निर्माण केल्याने आमदार साहेबांनी शिक्षकांचे कौतुक केले. सूत्रसंचालन शेख कदिर शेख शब्बीर यांनी केले. यावेळी मंचावर मौलाना अल्ताफ, मौलाना नईम रजा, मुफ्ती असरार, मौलाना आरिफ, मौलाना युनूस,मौलाना जैद उमरी,सलाउद्दीन सर, माजी नगर सेवक अय्युब अब्दुल रशीद बागवान,मुस्लिम बागवान, हाजी अबुल्लैस, शाफियोद्दीन मंसुरी, आकिब सर, महबुब मुतवल्ली व इतर गावाचे ज्येष्ठ सुजन्य लोक उपस्थित होते.