निर्मल इंटरनॅशनल स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

निर्मल इंटरनॅशनल स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

पाचोरा
निर्मल इंटरनॅशनल स्कूलमध्ये 13 वे वार्षिक स्नेहसंमेलन अतिशय दिमाखदार पध्दतीने संपन्न झाले. या कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून निर्मल फाऊंडेशनच्या अध्यक्षा आदरणीय सौ.वैशालीताई सुर्यवंशी उपस्थित होत्या. प्रथमत: प्रमुख अतिथी व अन्य मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्ज्वलन करुन सरस्वतीच्या प्रतिमेस मार्ल्यापण करण्यात आले व गणेशवंदनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली
विद्यार्थ्यांना नृत्याविष्कारासाठी दरवर्षी वेगवेगळे विषय देण्यात येतात. यावर्षी पाणी वाचवा, स्वच्छ भारत अभियान, शिक्षण , मोबाईलची अधीनता, यासारख्या विषयांवर सर्वच विद्यार्थ्यांनी नृत्याविष्कार सादर करुन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. विशेष म्हणजे स्वत:विद्यार्थ्यांनी वेगवेगळया भाषांमध्ये सूत्रसंचालन करुन सर्वांना आश्चर्यचकीत केले
आदरणीय सौ.वैशालीताई सुर्यवंशी यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांचे भरभरुन कौतुक केले. या
प्रकारच्या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो. आजची तरुण पिढी उदयाचे सामर्थ्यशाली राष्ट्र
निर्माण करणार आहे असे नमूद करुन येणाऱ्या नववर्षाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या
यावेळी शाळेच्या उपाध्यक्षा श्रीमती. कमलताई पाटील, सचिव नरेंद्रसिंग सुर्यवंशी, निर्मल सिड्सचे सर्व संचालक, पदाधिकारी , पालकवर्ग , प्राचार्य श्री.गणेश राजपूत, उपप्राचार्य श्री.प्रदिप सोनवणे,समन्वयक सौ.स्नेहल पाटील, श्री.शाही जोसेफ आदी उपस्थित होते
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिव्या पाटील व श्रृतिका पाटील हिने केले तर कार्यक्रमाचे आभार कु.पार्थ निकम याने मानले.