आखतवाडे ग्रा.पं. करणार आदर्श ग्रा.पं. पाटोदा यांचा प्रमाणे विकासक वाटचाल !

आखतवाडे ग्रा.पं. करणार आदर्श ग्रा.पं. पाटोदा यांचा प्रमाणे विकासक वाटचाल !

औरंगाबाद जिल्ह्यातील पाटोदा आदर्श ग्रामपंचायतीला विकासाच्या बळावर केंद्र शासनामार्फत देशातील अकरा ग्रामपंचायतींमध्ये आदर्श ग्रामपंचायत म्हणून स्थान मिळाले आहे. आदर्श पाटोदा ग्रा. पं. ला तत्कालीन राष्ट्रपती भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम साहेब यांच्या हस्ते केंद्र शासनाकडून निर्मलग्राम पुरस्कार प्रदान करण्यात आले आहे.
पाटोदा गावातील विकासक कामे आणि गावातील ग्रामस्थांना मोफत मिळणाऱ्या सोईसुविधा थोडक्यात पहा.
पाटोदा ग्रा. पं. जायकवाडी धरणाचे पाणी गावात आणले आहे. गावात शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यासाठी वाॅटर फिल्टरचा प्लॅट गावातच बसवले आहे. प्रत्येक कुटुंबाला २० लिटर पाणी मोफत दिलं जातं. सोलर वॉटर प्लांटच्या माध्यमातून सकाळी पाच ते आठ अंघोळीसाठी गरम पाणी मोफत दिलं जातं. ग्रा.पं. महिन्यातुन तीन वेळा एका कुटुंबाला मोफत दळण दळून देते. वेळेत जन्माची नोंद केल्यामुळे गावातील प्रत्येक नागरिकांच्या डिजीटल बोर्ड स्क्रीनवर गावातील चौकात वाढदिवस साजरा केला जातो. ग्रा.पं. शी संबंधित सर्व शासकीय कर्मचा-यांची बायोमेट्रिक पद्धतीने हजरेची नोंद होते. ग्रा. पं. ने मसाला गिरणी, शेवया मशिन, पापड मशिन हया सुविधा मोफत उपलब्ध करून दिल्या आहेत. गावात सी सी टि व्ही कॅमेरे लावले आहेत. गावातील सांडपाण्यासाठी शोषखड्डा केला आहे. गावात स्वच्छता राहावी म्हणून थुंकण्यासाठी ठिकठिकाणी वाॅश बेसिन बसविले आहेत. गावातील कुटुंबाना कपडे धुण्यासाठी धोबिघाट केलं आहे. अल्प दरात गावातील शेतकऱ्यांना शेत मशागतीसाठी ट्रॅक्टर उपलब्ध करून दिली आहे. गावात ठिकठिकाणी कचरा कुंड्या ठेवल्या असुन कचरा गोळा करण्यासाठी घंडा गाडी ठेवली आहे. गावात सगळ्यांना वायफाय मोफत दिलं आहे. गावात निसर्गरम्य सार्वजनिक समशानभूमीलगत १०० जांभळीचे झाडे आहेत. गावात चोवीस तास वीज उपलब्ध करून दिली आहे.
विशेष म्हणजे गावातील प्रत्येक घरांवर पती-पत्नीचे नाव टाकले आहेत. गावात सार्वजनिक बैठक व्यवस्था म्हणून सिमेंटची बाके ठेवली आहेत. गावात सार्वजनिक आणि खाजगी शौचालय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. आदर्श पाटोदा गावाला भेट दिल्यानंतर वाटत की आपल्या गावाची देखील पाटोदा गावासारखी वाटचाल केली पाहिजे. पाटोदा आदर्श गावाचे खरे शिल्पकार सरपंच मा. भास्करराव पेरे पाटील म्हणतात की, इच्छा शक्ती असेल तर तुमच्यासाठी अशक्य असं काहीच नाही. त्यांचे वारंवार मार्गदर्शन घेऊन आखतवाडे गावाचे सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रा.पं. सदस्य आणि दिपक गढरी आणि श्री मुरलीधर परदेशी, सामाजिक कार्यकर्ते आखतवाडे गावाच्या विकासावर ठाम झाले आहेत.