चोपडा महाविद्यालयात ‘जागतिक योग दिन’ साजरा

चोपडा महाविद्यालयात ‘जागतिक योग दिन’ साजरा

चोपडा : येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित, दादासाहेब डॉ. सुरेश पाटील महाविद्यालयात जिमखाना विभाग, राष्ट्रीय सेवा योजना व एन.सी. सी. यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २१ जून २०२३ रोजी ‘जागतिक योग दिनानिमित्त’ योग प्रशिक्षणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.ए.सूर्यवंशी हे होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून वसंतराव पाटील हे उपस्थित होते. याप्रसंगी योग प्रशिक्षक सौ. नीना वसंतराव पाटील यांनी आजच्या धकाधकीच्या जीवनात आरोग्यासाठी आवश्यक असे वेगवेगळ्या प्रकारचे आसने व प्राणायाम यांची उपयुक्त अशी माहिती देऊन योगाभ्यासाचा सराव करून घेतला.
या कार्यक्रमासाठी महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ऍड. संदीप सुरेश पाटील तसेच संस्थेच्या सचिव डॉ. सौ. स्मिता संदीप पाटील यांनी जागतिक योग दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. तसेच या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. ए. एल.चौधरी, महाविद्यालयाचे समन्वयक डॉ. शैलेश वाघ तसेच सर्व कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिमखाना विभागाच्या क्रीडा संचालक सौ.के. एस. क्षीरसागर एन.एस.एस विभाग प्रमुख डॉ.पी.के. लभाने व एन.सी.सी. विभाग प्रमुख कॅप्टन डॉ. बी.एम. सपकाळ, ए. ए. पाटील यांनी परिश्रम घेतले. तसेच या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी आर. एच. पाटील, एस. एच. बाविस्कर, भरत पाटील, राकेश काविरे, धीरज शिंपी व एन.
सी.सी. चे विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले.