नाफेड चे कांदा खरेदी केंद्र जळगाव जिल्ह्यात सुरू करावे दुसखेडा शेतकरीवर्गाने केली खासदार उन्मेश पाटलांकडे मागणी

नाफेड चे कांदा खरेदी केंद्र जळगाव जिल्ह्यात सुरू करावे दुसखेडा शेतकरीवर्गाने केली खासदार उन्मेश पाटलांकडे मागणी

नांद्रा(ता.पाचोरा)ता.21 महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मा.श्री.भारत जी. दिघोळे यांच्या मार्गदर्शना खाली दुसखेडा येथील शेतकरी यांनी बाजर स्थिरीकरण योजने अंतर्गत दरवर्षी नाफेड कडून कांदा खरेदी केली जाते.परंतु जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नाफेड च्या कांदा खरेदी बाबतीत योग्य ती माहिती मिळत नसल्याने कांदा विक्री मधे अडचणी येत असतात या वर्षी मे,जुन मधे नाफेड ची कांदा खरेदी केली जाईल त्या वेळेस जळगाव जिल्ह्यातील कांदा उत्पादकांचाही कांदा नाफेड ने खरेदी करावा यासाठी आपण नाफेड व केंद्र सरकार कडे याबाबत पाठपुरावा करावा व शेतकर्यांच्या कांदा पिकाला योग्य भाव मिळुन द्यावा या बाबतचे निवेदन खासदार उन्मेश पाटील यांना देण्यात आले .खासदार उन्मेश पाटील हे गिरणापरीक्रमा च्या दुसऱ्या टप्प्यातील परीक्रमाचाया वेळी दुसखेडा येथे आले असतांना याबाबतचे निवेदन शेतकरी मनोज मधुकर पाटील ,डी.एस. पाटील ,प्रकाश महाजन .यशवंत महाजन,नितीन महाजन, गणेश पाटील सरपंच मनोज पाटील उपसरपंच संजय भिल्ल व सर्व शेतकरी बांधव यांनी दिले। फोटो। दुसखेडा (ता.पाचोरा)येथे खासदार उन्मेश पाटील गिरणा परिक्रमा कार्यक्रमला आले असता शेतकर्यीनी निवेदन देतांना शेतकरी मनोज पाटील, डि.एस.पाटील, प्रकाश महाजन, नितीन महाजन, गणेश पाटील, सरपंच मनोज पाटील, उपसरपंच संजय भिल्ल आदी.