सेंट्रल बँक ऑफ इंडिया कडून आकर्षक डिपॉझिट आणि कर्ज योजना सुरू

सेंट्रल बँक ऑफ इंडिया कडून आकर्षक डिपॉझिट आणि कर्ज योजना सुरू,,,,

अमळनेर (जळगाव)- सेंट्रल बँक ऑफ इंडिया आपल्या स्थापनेची 112 वर्ष पूर्ण करीत आहे. या प्रसंगी बँकेने ग्राहकांसाठी आकर्षक योजनांची घोषणा केली आहे. यात नवीन डिपॉझिट योजना जाहीर केली आहे. यात 444 दिवसांचे मुदतीच्या ठेवीवर 7.35 व्याज दर देण्यात आला आहे. तर ज्येष्ठ नागरिक यांना ठेवीवर 7.85 असा आकर्षक व्याज दर दिला आहे. हे व्याजदर प्रचलित बँक व्याजदरा पेक्षा जास्तीचे असून सदर योजना मर्यादित कालावधी
करीताच आहे.
या सोबतच गृहकर्ज तसेच
वाहन कर्ज याचे व्याजदर हे देखील इतर बँकांच्या तुलनेत कमीच आहेत.
ह्या सार्‍या योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचण्यासाठी व्यक्तिगत संपर्क मोहीम हाती घेण्यात आली आहे. या करीता बँकेचे विभागीय आणि क्षेत्रीय व्यवस्थापक यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक बँक अधिकारी यांनी शहरातील प्रतिष्ठित नागरिक,व्यापारी, प्राध्यापक, शिक्षक तसेच शासकीय कर्मचारी यांच्या व्यक्तिगत भेटी घेण्याची मोहीम सुरू केली आहे. बँक शाखा व्यवस्थापक श्री. रमेश कवडे आणि बँक अधिकारी श्री सुनील सोन्हिया यांच्या जनसंपर्क मोहिमेला स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.