गोराडखेडा येथे चंद्रयान तीन मोहिमेच्या यशस्वीतेबद्दल शालेय विद्यार्थ्यांतर्फे जल्लोष

गोराडखेडा येथे चंद्रयान तीन मोहिमेच्या यशस्वीतेबद्दल शालेय विद्यार्थ्यांतर्फे जल्लोष

भारताची महत्त्वकांक्षी मोहीम चंद्रयान ३ यशस्वी झाल्याने गोराडखेडा येथे शालेय विद्यार्थ्यां तर्फे जल्लोष करत आनंद साजरा करण्यात आला. भारतासह संपूर्ण जगाचे लक्ष लागून असलेल्या चंद्रयान तीन मोहिमेसाठी २३ ऑगस्ट हा दिवस अत्यंत महत्त्वाचा होता. या दिवशी चंद्रयान तीन ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग केली. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जाणारा भारत जगाच्या पाठीवरील पहिला देश ठरला आहे. गोराडखेडा येथील नवजीवन विद्यालय पाचोरा येथे शिक्षण घेणाऱ्या आजी-माजी विद्यार्थ्यांतर्फे हा आनंद उत्सव साजरा करण्यात आला. नवजीवन विद्यालयातील शिक्षकांमार्फत चंद्रयान ३ मोहिमे संदर्भात विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली होती. त्यासोबतच सर्व विद्यार्थ्यांनी चंद्रयान ३ लँडिंग बघुत या अद्भुत व ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्याचे आवाहन करण्यात आले होते‌. विद्यार्थ्यांना मिळालेली माहिती व उत्सुकतेने चंद्रयान तीन लँडिंग चा प्रत्यक्ष अनुभव घेतला. तसेच चंद्रयान ३ चे यशस्वी लँडिंग झाल्यानंतर या विद्यार्थ्यांनी एकत्र येत जल्लोष साजरा केला. प्रसंगी भारत माता की जय, वंदे मातरम, जय हो इंडिया, जय हो इस्रो अशा घोषणा देत विद्यार्थ्यांनी आनंद साजरा केला. विद्यार्थ्यांचा उत्साह व जल्लोष पाहून नवजीवन विद्यालयातील शिक्षण घेणाऱ्या या विद्यार्थ्यांचे विठ्ठलाचे मुख्याध्यापक एस बी पवार गोराडखेडा येथील सहशिक्षक मनोज पाटील व गावातील सुज्ञ नागरिकांनी विद्यार्थ्यांच्या उत्साहाचे अभिनंदन करत त्यांच्या जल्लोषात सहभाग घेतला आहे.