गोराडखेडा येथील जाधव परिवारातील बहिण भावंडांचे एसएससी व एचएससी परीक्षेत यश

गोराडखेडा येथील जाधव परिवारातील बहिण भावंडांचे एसएससी व एचएससी परीक्षेत यश

गोराडखेडा लोकप्रतिनिधी, विद्यालयातील शिक्षक व आजी-माजी विद्यार्थ्यांतर्फे सत्कार

येथील रहिवासी धनुबाई मुरलीधर भावडू पाटील यांचे नात व नातू तसेच कविता अशोक मुरलीधर पाटील यांचा मुलगा मोहित अशोक पाटील याने एसएससी परीक्षेत विद्यालयात द्वितीय क्रमांक मिळवत भरघोस यश संपादन केले आहे. पाचोरा येथील नवजीवन विद्यालयात दहावी वर्गात प्रविष्ट विद्यार्थी मोहित पाटील याने ८३.४० टक्के गुण मिळवत विद्यालयात द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. या अगोदरही नवजीवन विद्यालयात प्रविष्ट गोराडखेडा येथील विद्यार्थ्यांनी सलग चार वर्षांपर्यंत विद्यालयात प्रथम क्रमांक मिळवत गोरारखेडा गावाच्या शिरपेचा मानाचा तुरा रोवल आहे. हीच श्रृंखला कायम ठेवत एसएससी २०२२-२०२३ मध्ये मोहितने द्वितीय क्रमांक मिळवत यश संपादन केले आहे. त्यासोबतच त्याची बहीण कविता अशोक पाटील हीने पाचोरा येथील मिठाई कन्या महाविद्यालयातून एच एस सी परीक्षेत ७३.२० टक्के गुण मिळवत पाचवा क्रमांक पटकाविला आहे. तसेच मुरलीधर भावडू पाटील यांचे कनिष्ठ चिरंजीव दशरथ मुरलीधर पाटील यांची कन्या अस्मिता दशरथ पाटील हिने एसएससी परीक्षेत ८३.८० टक्के गुण मिळवत विद्यालयात पहिला क्रमांक पटकाविला आहे. या कुटुंबातील दोन्ही बहिणी व भावाने मिळविलेले यश कौतुकास्पद असून गावातील शिक्षण प्रेमी लोकप्रतिनिधी व तरुणांकडून मुरलीधर भावडू पाटील यांच्यासह संपूर्ण परिवाराचा व गुणवंत विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
मोहित, कविता, अस्मिता शेतकरी कुटुंबाशी निगडित असून माता-पित्यांचा व्यवसाय शेती आहे. घरातील योग्य संस्कार व शिक्षणाची आस्था असल्याने दोन्ही भावंडांनी आई-वडिलांना शेती व्यवसायात मदत करण्यासोबतच अभ्यासातही रुची ठेवत परिश्रम घेतले. त्यासोबतच शिक्षकांचे वेळोवेळी मार्गदर्शनही लाभले. त्यामुळे तिघांनी आपापल्या विद्यालयात क्रमांक पटकावत घवघवीत यश संपादन केले आहे. या विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल गोराडखेडा बु सरपंच पती जनार्दन पाटील, ग्रामपंचायत सदस्य मनोजआप्पा पाटील, राजेंद्र पवार, दै. देशदूतचे पत्रकार ग्राम. सदस्य तथा नवजीवन विद्यालयाचे उपशिक्षक मनोज पाटील, पोलीस पाटील संजय पाटील, नवजीवन विद्यालयाचे आजी-माजी विद्यार्थी सागर पाटील, समाधान पाटील, विशाल पाटील, गुरु पाटील, आदींच्या उपस्थितीत जाधव परिवाराचे अभिनंदन करत शुभेच्छा देण्यात आल्या.

उत्तमराव राठोड (अध्यक्ष नवजीवन विद्यालय पाचोरा):- विद्यालयात ग्रामीण भागातील विद्यार्थी गुणांची योग्य टक्केवारी गाठत घवघवीत यश संपादन करत आहेत ही बाब आनंददायी आहे. या कामी विद्यालयाती शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन व विद्यार्थ्यांचे परिश्रम अभिनंदनीय आहेत. तसेच मुख्याध्यापक एस बी पवार, संपूर्ण शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व गोराडखेडा येथील नवजीवन विद्यालयाचे उपशिक्षक मनोज पाटील यांचेही विशेष अभिनंदन.