श्री.गो.से.हायस्कूल येथे शाळा प्रवेशोत्सव-2025/26 संपन्न

श्री.गो.से.हायस्कूल येथे शाळा प्रवेशोत्सव-2025/26 संपन्न

 

आज दिनांक 16 /6/ 2025 सोमवार रोजी शासनाच्या निर्देशानुसार सकाळी 7 वाजता शाळा प्रवेशोत्सव पा.ता.सह.शिक्षण संस्थेच्या श्री.गो.से.हायस्कूल.पाचोरा. येथे संपन्न झाला.

याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे चेअरमन श्री.खलील दादा देशमुख, तांत्रिक विभाग प्रमुख श्री.वासुदेव महाजन, श्री.सतीश नारायण चौधरी, तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.एन.आर.पाटील, उप मुख्याध्यापक श्री.आर. एल. पाटील, पर्यवेक्षिका सौ.अंजली गोहिल, श्री. आर.बी.तडवी, श्री.एस. एन. पाटील.यांच्या समवेत सकाळ सत्रातील सर्व शिक्षक बंधू- भगिनी व विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते प्रतिनिधिक स्वरूपात इयत्ता 5 वी च्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक संच वाटप करण्यात आलेत. यावेळी शाळेच्या प्रवेशद्वारा जवळ आकर्षक पताका,रांगोळी, फलक लेखन करण्यात आले होते.

इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांसमवेत गुलाबपुष्प व अल्पोपहार वाटपही करण्यात आले.

अशा रीतीने शैक्षणिक वर्ष 2025-26 शाळा प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न झाला.