वाडी शेवाळे ग्रामपंचायत सभागृहात माजी मंत्री के. एम. बापूंच्या प्रतिमेचे अनावरण

वाडी शेवाळे ग्रामपंचायत सभागृहात माजी मंत्री के. एम. बापूंच्या प्रतिमेचे अनावरण

पाचोरा- पाचोरा तालुक्यातील वाडी -शेवाळे ग्रामपंचायतीच्या सभागृहात माजी मंत्री के.एम. बापू पाटील यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले आहे. 9 ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधत गावातील मान्यवर यांच्या हस्ते वाडी गावाचे सुपुत्र माजी मंत्री कै. के.एम. बापू पाटील यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले. यावेळी गावाच्या प्रथम नागरिक, सरपंच सौ. रेखाबाई नंदू पाटील व उपस्थित मान्यवरांनी बापू साहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

वाडी -शेवाळे ग्रामपंचायत व विविध सामाजिक सेवा क्षेत्रातील पदाधिकारी यांच्या वतीने हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य प्रकाश एकनाथ पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकात बापूसाहेबांच्या जलसंधारण, सामाजिक शैक्षणिक व सहकार क्षेत्रातील कार्याला उजाळा दिला. जनतेच्या समस्या सोडवताना गोरगरीब जनतेस कशाप्रकारे न्याय मिळवून दिला, याबाबतचे दाखले त्यांनी यावेळी दिले. बापूसाहेबांचे स्वप्न साकार करण्यात आम्ही ग्रामस्थ प्रयत्नशील राहू असे अभिवचन यावेळी त्यांनी ग्रामस्थांना दिले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदू पाटील यांनी केले तर बापूसाहेबांचे नातू जयदेव पाटील यांनी आभार मानले.

विकास सोसायटी चेयरमन रमेश पाटील , उपसरपंच सोपान बाजीराव पाटील, ग्रामपंचायत सदस्य समाधान पाटील, सौ. संध्या पाटील, लताबाई पाटील, सीमा पाटील, प्रवीण पाटील, पोलीस पाटील संजय बाबुराव पाटील, सोसायटी चेअरमन रमेश पाटील, डॉ. एल टी पाटील, डॉ. शेखर पाटील, गणेश पाटील, सुभाष पारखे, पुंडलिक पाटील, रवींद्र पाटील, भिवसन पाटील, भगवान पाटील,मनोज पाटील यांनी कार्यक्रमाला विशेष सहकार्य केले. यावेळी गावातील आबालवृद्ध, नागरिक, युवावर्ग व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.