जनतेच्या समस्यासाठी लेकीच्या पुरस्कार सोहळ्यात बापच अनुपस्थित

जनतेच्या समस्यासाठी लेकीच्या पुरस्कार सोहळ्यात बापच अनुपस्थित

पाचोरा (प्रतिनिधी) – पाचोऱ्याच्या कन्येला कोल्हापूर येथे राज्यस्तरीय क्रिडा रत्न पुरस्कार आज देण्यात आला मात्र या सुखद प्रसंगी हा सोहळ्यात सहभागी होण्यासाठी बापाची इच्छा असुनही केवळ जनसेवेसाठी अनुपस्थिती द्यावी लागले त्याचे कारण असेच होते.

शहरातील कन्या जीने देशात व्हाईट रिव्हर राफ्टिंग’मध्ये कमी वयात विक्रम करुन हे खडतर सैनिकी प्रशिक्षण पुर्ण करुन महाराष्ट्राची मान उंचावली ती सहीष्णा सचिन सोमवंशी हीला आता आपल्या यशाचे राज्यात पुरस्कार रुपी सन्मान मिळु लागले आहे कोल्हापूर येथील एका संस्थेने आज दि. २० रोजी निर्भया महोत्सवात दिमाखदार पुरस्कार सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांना वितरत केले या सोहळ्यात सहीष्णा सोबत तिचे वडील सचिन सोमवंशी असने अनिवार्य होते मात्र पाचोरा शहरातील व तालुक्यातील जनतेसाठी उद्या दि. २१ मार्च रोजी शिंगाडा मोर्चा चे आयोजन करण्यात आले आहे त्यामुळे लेकीच्या पुरस्कार सोहळ्यात बापच अनुपस्थित राहिल्याने याची चर्चा शहरात सुरू झाली राजकीय वर्तुळात अशाही प्रसंगाला सामोरे जावे लागते याचा प्रत्यय आल्याने सचिन सोमवंशी यांच्या या निर्णयाचे कौतुक होत आहे