गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल,पाचोरा तर्फे चंद्रयान-३ प्रदर्शनाचे आयोजन

गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल,पाचोरा तर्फे चंद्रयान-३ प्रदर्शनाचे आयोजन

आज दि.२३/०८/२०२३ रोजी गुरुकुल शाळेतील विद्यार्थ्यांनी चंद्रयान-३ मिशन शी संबंधित विविध मॉडेल्स व प्रोजेक्ट बनविले. त्यामध्ये रॉकेट, लॉन्चर ,सॅटॅलाइट ऑर्बिटर, रोअर इ.ची प्रतिकृती बनवून चंद्रयान-३ शी संबंधित मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेमध्ये विद्यार्थ्यांना, पालकांना व प्रमुख पाहुण्यांना माहिती दिली. तसेच पृथ्वीपासून ते चंद्रापर्यंत चंद्रयान मिशन-३ चे वर्किंग मॉडेल प्रदर्शित केले. त्याशिवाय शाळेमार्फत अंतराळातील ग्रह ,तारे ,आकाशगंगा इ.वस्तू बघण्यासाठी वास्तविक टेलिस्कोप चे आयोजन करण्यात आले व भेट देणाऱ्यांनी उस्तुकतेने टेलिस्कोपच्या साहाय्याने अवकाशगंगेतील ग्रहांचा आनंद घेतला. वर्किंग मॉडेल मध्ये पृथ्वीपासून चंद्रापर्यंत जाणारे रॉकेट, चंद्राभोवती फिरणारे ऑर्बिटर व चंद्रावर संशोधन करणारे रोअर चलकृती करताना दाखविण्यात आले. चंद्रयान-३ची *२३ ऑगस्टला* होणारी लँडिंग कशा पद्धतीने होणार आहे हे प्रोजेक्टरद्वारे प्रदर्शनीला भेट देणाऱ्यांना दाखविण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घघाटन मा. गटशिक्षण अधिकारी श्री. गिरीष जगताप साहेब पंचायत समिती,पाचोरा यांच्या हस्ते दीपप्रज्वलन ,फित कापून व रॉकेट प्रतिकृतीचे लॉन्चिंग साठी बटन दाबून केले. कार्यक्रमाला पंचायत समिती पाचोराचे केंद्रप्रमुख श्री.खैरनार साहेब, श्री. हरिभाऊ पाटील, डॉ. मनीष चंदनानी हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या पर्यवेक्षिका सौ.अमिना बोहरा मॅडम तसेच आभार प्रदर्शन शाळेचे संस्थापक व प्राचार्य श्री. प्रेम शामनानी सर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक, शिक्षिका ,शिक्षकेत्तर कर्मचारी, शाळेचे माजी विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले.
तसेच श्री प्रेम शामनानी सर यांनी ज्यांना टेलीस्कोपच्या साह्याने आज रात्री 8ते 10 च्या दरम्यान चंद्र बघायचा असेल ते गुरुकुल स्कूल पाचोरा येथे येऊन बघायला मुबा दिली आहे.