_भडगाव तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत आदर्श कन्या विद्यालयास तिहेरी मुकूट

_भडगाव तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत आदर्श कन्या विद्यालयास तिहेरी मुकूट….!!!!_

भडगाव -क्रीडा व युवक सेवा संचालनालय,पुणे,जळगाव जिल्हा क्रीडा कार्यालय तथा भडगाव तालुका क्रीडा समितीच्या संयुक्त विद्यमाने सौ.रजनीताई देशमुख,कला-वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,भडगाव येथील क्रीडांगणावर भडगाव तालुकास्तरीय मुलींच्या खो-खो स्पर्धा खेळाडूंच्या मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या.
स्पर्धेत १४ वर्षाआतील मुलींच्या गटात आदर्श कन्या विद्यालयाच्या संघाने जवाहर हायस्कूल विरुध्द डावाने विजय मिळवला. तर १७ वर्षाआतील मुलींच्या गटात आदर्श कन्या विद्यालयाने एकतर्फी झालेल्या अंतिम सामन्यात माध्यमिक विद्यालय,वाडे संघाचा पराभव करत जेतेपद प्राप्त केले वाडे विद्यालयास उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले,तर गटात अँग्लो उर्दू हायस्कूल,भडगाव हा संघ तृतीय स्थानी राहिला.१९ वर्षाआतील मुलींमध्ये आदर्श कन्या विद्यालय,भडगावचा संघ विजयी ठरला.
स्पर्धेतील विजयी-उपविजयी संघाचे कौतुक सौ.रजनीताई देशमुख,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन.एन.गायकवाड,क्रीडा संचालक प्रा.डॉ.दिनेश तांदळे,प्रा.डॉ.अतुल देशमुख,मुख्याध्यापक नाजीम सर,प्रा.कांबळे,प्रा.चौधरी,यांनी केले तर स्पर्धा यशस्वीतेसाठी क्रीडा समन्वयक प्रा.डॉ.सचिन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा शिक्षक रविंद्र महाजन,निलेश मोरे,भिमसिंग परदेशी,रहिम बागवान यांनी मेहनत घेतली,स्पर्धेस पंच म्हणून राष्ट्रीय खो-खो पंच प्रा.प्रेमचंद चौधरी यांनी काम पाहिले.
स्पर्धा यशस्वीतेसाठी सौ.रजनीताई देशमुख महाविद्यालयाचे खेळाडू शुभम निकुंभ,हर्षल पाटील,तेजस पाटील,रवि काळे,जगदीश पाटील,ज्योती पाटील,पुजा महाले आदिंनी मेहनत घेतली.