ए.एम फाउंडेशन मध्ये मिळणार प्रत्येक तरुणांना काम करण्याची संधी

ए.एम फाउंडेशन मध्ये मिळणार प्रत्येक तरुणांना काम करण्याची संधी

देशपातळीवर कार्यरत असणारी एकमेव सामाजिक संघटना ए.एम फाउंडेशनची सुरुवात करण्यात आलेली आहे. समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचे काम या ए.एम फाउंडेशनच्या माध्यमातून केले जाणार आहे.राज्यात प्रत्येक ठिकाणी गाव पातळी ते जिल्हा पातळीपर्यंत संघटनात्मक रचना केली जाणार आहे.कोणाचीही जात-पात-धर्म न बघता सर्वसमावेशक धोरण डोळ्यासमोर ठेवून हे फाउंडेशन काम करणार आहे.

राज्यातील शिक्षकांची एक मोठी सल्लागार समिती स्थापन करण्यात येणार आहे.यामध्ये राज्यभरातील सर्व शिक्षक मंडळींना सामावून घेतले जाणार आहे. आपल्या कौशल्याचा फायदा समाजातील घटकांना व्हावा यासाठी उच्चस्तरीय सल्लागार समिती गठित करण्यात येणार आहे.त्यामध्ये गाव पातळीपासून ते जिल्हा पातळीपर्यंतच्या शिक्षकांना स्थान देण्यात येणार आहे. ज्या शिक्षकांना समाजसेवेची आवड असेल त्यांनी आपलं नाव व पत्ता पाठवून फाउंडेशन मध्ये नोंदणी करायची आहे.तसेच प्रत्येक क्षेत्रातील उच्चस्तरीय समिती देशपातळीवर गठित करण्यात येणार आहे.योग्य वेळी प्रतिष्ठित व्यक्तीकडून यांचा गौरव/ सन्मान केला जाईल. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर फाउंडेशनच्या कामाला जोमाने सुरुवात होणार आहे.आपण कोणत्याही राजकीय पक्षाचे असलात तरी काहीही हरकत नाही या ए.एम फाऊंडेशनचे काम हे राजकारण विरहित असणार आहे.

देशातील तरुणांच्या विकासासाठी व कौशल्यासाठी फाऊंडेशनच्या माध्यमातून सर्वपक्षीय नेते मंडळी ,सत्ताधारी आमदार,खासदार,मंत्री यांचे मार्गदर्शन शिबीर दर वर्षी व दर तीन महिन्यातून आयोजित करण्यात येणार आहे.जेणेकरून सर्वसामान्यांना त्यांच्या अडकलेल्या कामात मदत होईल अनेक विषय या फाउंडेशन च्या माध्यमातून आपले मार्गी लागू शकतात.आपण कुठल्याही गावचे ,शहराचे असो आपण आपल्या माध्यमातून स्थानिक ठिकाणी या फाऊंडेशनचे काम करू शकतात. या फाउंडेशनचे धोरण ,ध्येय, उद्दिष्ट लवकरच प्रकाशित करण्यात येईल. लोकांच्या न्याय्य हक्कासाठी देशपातळीवर रस्त्यावर उतरून आंदोलन करणारे हे पहिले आक्रमक सामाजिक संघटन असणार आहे. प्रत्येक लोकप्रतिनिधींना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देण्याचे काम या फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. ज्या ज्या लोकांना या फाउंडेशन मध्ये काम करण्याची इच्छा आहे. त्या सर्व तरुण-तरुणी, बंधू-भगिनी या फाउंडेशन मध्ये आपल्या नावाची नोंदणी करावी व ए. एम फाउंडेशन परिवारा मध्ये सहभागी व्हावे.

मुंबई येथील तरुण तडफदार नेते अनिल भाऊ महाजन यांच्या नेतृत्वात स्थापन झालेले हे रोपटे एक दिवस वटवृक्ष झाल्याशिवाय राहणार नाही.या फाउंडेशन ला वटवृक्ष करण्यासाठी व समाजातील सर्व लोकांना याचा फायदा व्हावा यासाठी सर्वांनी प्रयत्न करूया.करोनाच्या या जागतिक महामारीत अनेक लोकांचे हाल होत आहेत.यासाठी संघटनात्मक संघटन महत्वाचे आहे. तरी सर्वांनी या फाउंडेशन मध्ये सहभागी व्हावे असे आव्हान ए.एम फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अनिलभाऊ महाजन यांनी केले आहे.

लवकरच ए.एम फाऊंडेशनचे प्रदेश, जिल्हा,तालुका ,गावपातळीवरील सर्व आघाड्याची कार्यकारिणी घोषित करण्यात येईल.

अधिकृत वाटसप जॉईन AM फाऊंडेशन – 9594754725

आपला स्नेहांकित
गणेश पुजारी

प्रसिद्धीप्रमुख .
ए.एम फाउंडेशन.
मो.बा- ९०२९०१९२०४/ ८८८७४५३३७७.
ईमेल आयडी :- *amfoundation02@gmail.com*