भारतीय स्वातंत्र्यदिनी पाचोऱ्यात नाटक सादर

भारतीय स्वातंत्र्यदिनी पाचोऱ्यात नाटक सादर

पाचोरा शहरात 100 फुटी तिरंगा येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त कमलेश सोनवणे द्वारा ‘भारताचा अमृतकाळ’ या विषयावर नाटक सादर करण्यात आले.
गेल्या 76 वर्षांतील भारताच्या उपलब्धी आणि पुढील 25 वर्षांत अर्थात भारताच्या अमृतकाळात नागरिकांची भूमिका आणि कर्तव्ये हे नाटक स्वरूपात दाखवण्यात आले.
त्याचबरोबर भारत सरकारच्या ‘मेरी माटी मेरा देश’ राष्ट्रव्यापी अभियानाबद्दलही माहिती देण्यात आली. अमृतकाळासाठीच्या पंचप्राण म्हणून पाच प्रतिज्ञांची सामूहिक शपथही यावेळी घेण्यात आली.
यावेळी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी श्रीमती. शोभा बाविस्कर, शहरातील नामवंत व्यक्ती, शालेय विद्यार्थी व इतर अनेक लोकं उपस्थित होती.