मा.वैशालीताई सुर्यवंशी यांनी घेतली जिल्हाधिकारी यांची सदिच्छा भेट

मा.वैशालीताई सुर्यवंशी यांनी घेतली जिल्हाधिकारी यांची सदिच्छा भेट

पाचोरा- पोलीस पाटील व कोतवाल पदाची भरती जळगाव जिल्ह्यात तालुकानिहाय होत आहे.13 ऑगस्ट 2023 रोजी जळगाव येथे विविध परीक्षा केंद्रांवर पोलीस पाटील व कोतवाल पदाची लेखी परीक्षा घेण्यात आली. सदर परीक्षा अतिशय पारदर्शक व शिस्तबद्ध पद्धतीने घेण्यात आली. कोणत्याही प्रकारची कॉपी तसेच अनुचित प्रकार या ठिकाणी झाला नाही; त्याबद्दल शिवसेनेच्या नेत्या सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांनी मा. जिल्हाधिकारी श्री.आयुष प्रसाद यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार मानले.लेखी परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची तोंडी परीक्षा देखील पारदर्शक व सी.सी.टी.व्ही च्या निगराणीत व्हावी जेणेकरून हुशार व मेहनती उमेदवारांची या पदांसाठी निवड होईल अशा प्रकारचे निवेदन सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांनी मा.जिल्हाधिकारी यांना दिले.
याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख श्री. दीपक राजपूत,उपजिल्हाप्रमुख श्री. उद्धव मराठे तालुकाप्रमुख श्री.शरद पाटील, शहरप्रमुख अँड. दीपक पाटील आदी उपस्थित होते.