पाचोरा येथील प्रांत कार्यालयासमोर जयहिंद लेझीम मंडळ कृष्णापुरी तर्फे एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाला प्रचंड प्रतिसाद

पाचोरा येथील प्रांत कार्यालयासमोर जयहिंद लेझीम मंडळ कृष्णापुरी तर्फे एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाला प्रचंड प्रतिसाद

पाचोरा ( संदीप तांबे )
दिनांक 25 ऑगस्ट 2023 रोजी पाचोरा येथील प्रांत अधिकारी कार्यालयासमोर पाचोरा कृष्णापुरी येथील जयहिंद लेझीम मित्र मंडळ तसेच कृष्णापुरी परिसरातील नागरिकांच्या वतीने एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले आहे. या उपोषणाच्या माध्यमातून समस्त कृष्णापुरी व पाचोरा वासियांच्या विविध मागण्या या ठिकाणी करण्यात आले आहेत, यामध्ये भारत डेअरी बसस्टॉप ते पांडव नगरी पर्यंत ठिकठिकाणी गतिरोधक बसवावे त्याचबरोबर मुख्य हायवे रस्ता व पाचोरा शहरात मोकाट पाळीव प्राणी सोडण्यात आलेले आहेत त्या पाळीव प्राण्यांचा प्रशासनाने बंदोबस्त करावा त्याचबरोबर पाचोरा शहरातून जाणाऱ्या मुख्य हायवे रस्त्यावर पदतीने रात्री नेहमी सुरू असावे अशा विविध मागण्यांसाठी एक दिवसी लाक्षणिक उपोषण या ठिकाणी करण्यात आले आहे.

या उपोषणाला कृष्णापुरी येथील नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून या ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाचे नेते वैशाली सूर्यवंशी त्याचबरोबर भाजपाचे शहर तालुका अध्यक्ष अमोल भाऊ शिंदे यांनी देखील या उपोषणाला भेट दिली आहे. त्याचबरोबर या उपोषणा संबंधित पाचोरा प्रांताधिकारी भूषण अहिरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत सदर राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यालयाला थेट कळवले असून त्याबाबत संबधित विभागाचे पत्र देखील प्राप्त झाले आहे. व लवकरच जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने या ठिकाणी गतिरोधक बसविण्यासंदर्भात निर्णय घेऊन पुढील कार्यवाही केली जाईल असे यावेळी त्यांनी सांगितले आहे.