विधी अधिकारी पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन

विधी अधिकारी पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन

जळगाव, दि. १२ :- जिल्हाधिकारी, जळगाव यांचे आस्थापनेवर विधी अधिकारी (कंत्राटी) हे एक पद 11 महिन्यांचे कंत्राटी तत्वावर भरण्याकरिता दिनांक 14 ते 25 ऑक्टोबर, 2021 या कालावधीत पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

या पदासाठी करावयाच्या अर्जाचा नमुना पदाच्या अनुषंगाने भरावयाचे परिशिष्ट अ, ब आणि क जिल्हाधिकारी, जळगाव यांचे कार्यालयातील आस्थापना शाखेत तसेच कार्यालयाचे http://www.jalgaon.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी परिशिष्ट अ,ब आणि क तसेच अर्जाचा नमुना व कार्यालयातून अथवा संकेत स्थळावरुन प्राप्त करुन घेतल्यानंतर विहित नमुन्यात अर्ज करावा. असे आवाहन अभिजीत राऊत, अध्यक्ष, जिल्हा निवड समिती तथा जिल्हाधिकारी यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वे केले आहे.